लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण आपापल्या आवडत्या गाण्यांवर आपल्या आवडत्या गाण्यांवर नाचताना दिसतो. सोशल मीडियावर असे एकापेक्षा एक व्हिडिओ रोज पाहायला मिळतात ज्या लोक बिनधास्तपणे नाचत असतात. असे व्हिडीओ नेटकऱ्यांना कधी कधी लोकांना प्रचंड आवडतात. अलीकडेच अशाच एक व्हिडिओने लोकांची मने जिंकली आहेत. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती प्रभुदेवाच्या ‘मुकाबला-मुकाबला’ या गाण्यावर उत्तम प्रकारे नाचताना दिसत आहे. तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्हीच बघा.
हेही वाचा – कृष्ण जन्माची आठवण करून देणारा प्रसंग! पुराच्या पाण्यातून चिमुकल्याला वाचवले, Viral Video एकदा बघाच
“मुकाबला मुकाबला गाण्यावर प्रभुदेवाला टक्कर देतोय हा व्यक्ती
“मुकाबला मुकाबला या प्रभुदेवा यांच्या प्रसिद्ध गाण्यावर ही व्यक्ती अप्रतिम नृत्य करत आहे. व्यक्तीचे हावभाव लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. व्यक्तीचे नृत्य पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. नृत्य पाहून काही लोक टाळ्या वाजवत आहेत कर काही लोक शिट्ट्या मारत आहे. व्यक्तीचे अप्रतिम नृत्य लोकांना प्रचंड आवडले आहे. “हा थेट प्रभु देवाला थेट टक्कर देत आहे.” असेही काही लोक म्हणत आहे.
मुकाबला आणि प्रभुदेवा
प्रभू देवा हे उत्तम डान्सर आणि कोरियोग्राफर्सकांपैकी एक आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. मुकाबला मुकाबला हे गाणे १९९४ च्या ‘हमसे है मुकाबला’ या चित्रपटातील आहे आणि ए.आर. रहमान यांनी संगीत दिले होते. जेव्हा प्रसिद्ध कोरियाग्राफर यांनी प्रभदेवाबरोबर स्ट्रीट डान्सर थ्रीडी(StreetDancer3D) या चित्रपट केला तेव्हा या चित्रपटात मुकाबला या गाण्यावर पुन्हा एकत्र काम केले.
जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून जाते टॅलेंट
इंस्टाग्रामवर व्हिडिओ marathiasmitaofficial नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”टॅलेंट हे अनेकदा जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून जाते.
नृत्य ही अशी कला आहे ज्यासाठी खूप कौशल्य लागते. हे कौशल्य एखाद्या व्यक्तीला खूप सराव केल्यानंतर मेहनत घेतल्यानंतर मिळते. काही लोकांमध्ये नृत्य करण्यासाठी योग्य कौशल्य असते पण अनेकदा लोकांकडे नृत्य कौशल्य असूनही त्यामध्ये करिअर करता येत नाही. परिस्थिती आणि जबाबदार्यांच्या ओझ्याखाली अनेकांचे कौशल्य दाबले जाते. व्हायरल व्हिडीओतील व्यक्तीच्या नृत्य कौशल्यामुळेच त्याचे सर्वत्र कोतूक होत आहे.
व्हायरल व्हिडीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
व्हिडीओवर कमेंट करून नेटकऱ्यांनी याव्यक्तीचे कौतूक केले आहे.
एकजण म्हणाला की, “वा शाबाश रे पठ्या… एकच नंबर…”
दुसरा म्हणाला,” एक नंबर भावा”
तिसरा म्हणाला, जिंकलंस भावा!