गरुड, ससाणा आणि गिधाड यांसारख्या पक्ष्यांना शिकारी पक्षी म्हटलं जातं. जेव्हा ते इतर प्राण्यांवर हल्ला करायला जातात, तेव्हा ते त्यांना एका झटक्यात पकडून त्यांची शिकार करतात. त्यांचा हल्ला अतिशय धोकादायक असतो की इतर पक्ष्यांना त्यांच्यापासून बचाव करणं कठीण होऊन जातं. या पक्ष्यांचा आकारही मोठा आहे. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक गरुड दिसत आहे, जे इतर गरुडांपेक्षा खूप वेगळं आणि मोठं आहे. ते इतकं मोठं आहे की फक्त एका पंजाने शिकार पकडताना दिसतं. या गरुडाने चक्क कोल्ह्याची शिकार केली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एका मोठ्या आकाराच्या गरुडाने चक्क एका कोल्ह्याची शिकार केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.गरुड हा चाणाक्ष आणि चपळ शिकारी म्हणून ओळखला जातो. कोल्ह्याची शिकार केल्यानंतर त्याला पंजांमध्ये धरुन हा गरुड डोंगराच्या कठड्यावर बसल्याचं दिसून येत आहे. अचानक हा गरुड या पूर्णपणे वाढ झालेल्या कोल्ह्याला पंजांमध्ये घेऊन आकाशात झेप घेतो. हा गरुड जेव्हा उडतो तेव्हा त्याच्या दोन्ही पंजांनी त्याने या मेलेलेल्या कोल्ह्याला घट्ट पकडलं आहे. गरुड झेप घेतो त्यावेळी या कोल्ह्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ जुना असला तरी सोशल मीडियावर तो पुन्हा व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला ३ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने विचारलं, की तो पक्षी कसा मेला, गरुडाने मारला का? एकाने म्हटलं, की गरूड अनेकदा त्याच्या घराच्या समोर येतात . तिसऱ्याने म्हटलं, की गरुडाने त्याला पंजाने पकडलं नाही, त्याने फक्त आपली नखं आत घातली आणि पक्ष्याला घेऊन उडून गेला. इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.