इंटरनेटवर नेहमी रंजक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या पावसाळा सुरु असल्याने सतत निसर्गरम्य ठिकाणे, धबधबे, किंवा पूर किंवा धबधब्यावरी अपघाताचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. पावसाळ्यामध्ये रस्ते जलमय झाले आहेत. अशा साचलेल्या पाण्यात खेळणाऱ्यांचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान आता. आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे जो पाहून तुमच्या बालपणीच्या आठवणी जाग्या होतील.व्हायरल व्हिडिओमध्ये काही तरुण कंबरेपर्यंत साचलेल्या पाण्यात व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहे. सर्वजण पाण्यात खेळण्याचा आनंद लुटताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओमध्ये पाहू शकता, पावसाचे पाणी मैदानावर सर्वत्र पसरले आहे. दरम्यान व्हॉलीबॉलच्या मैदानावर नेट लावून काही मुले साचलेल्या पाण्यात उभे राहून व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहे. व्हिडीओत “खेळाचे मैदान पूर्णतः पाण्याने भरले आहे. पाहताक्षणी एखादे तळे किंवा नदी असल्याचा भास होतो. पण काही मुले कसलीही पर्वा न करता आनंदाने पाण्यात खेळत आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला आहे. व्हिडीओला भरपूर पसंती दिली जात आहे. इंस्टाग्रामवर volleydonor नावाच्या अकांऊटवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हे दक्षिण भारतातील तामिळनाडू कुट्टिक्कादावु कोझिकोड जिल्ह्यातील दृश्य आहे.”

हेही वाचा – एकटेपणाला कंटाळून मायक्रोसॉफ्टचा कर्मचारी चालवतोय चक्क रिक्षा? येथे पाहा Viral Post

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘पाण्यातही व्हॉलीबॉलचा उत्साह’ असे लिहिले आहे. हा व्हिडिओकुट्टीक्कडवू कोझिकोड जिल्ह्यातील एक सुंदर परिसरातील आहे. व्हॉलीबॉल प्रेमींची वर्दळ असलेले हे ठिकाण आहे. कॅप्शनमध्ये पुढे स्पष्ट करण्यात आले आहे की, पावसाळ्यात लोकांच्या अंगणात पाणी तुंबणे सामान्य गोष्ट आहे. अशा परिस्थितीतही लोक रोज व्हॉलीबॉल खेळताना दिसतात.

हेही वाचा – खिडकीतून एसटी बसमध्ये चढणे तरुणाला पडले महागात! चढता चढता पुढच्या क्षणी घडले असे काही…पाहा Viral Video

कुट्टीक्कडवू येथे पावसाळ्यात व्हॉलीबॉल खेळण्याची मजा काही वेगळी असते, असे म्हटले जाते. या व्हिडिओला आतापर्यंत ४६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर २ लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओ पाहणाऱ्या एका युजरने लिहिले की, :जर फक्त हा सामना पाहण्यात एवढी मजा येत असेल तर तो खेळण्यात किती मजा येईल.” आणखी एका युजरने लिहिले की, :यार, त्यांना खेळताना पाहून खूप छान वाटतं, हे मला माझ्या बालपणीची आठवण करून देते.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unbelievable passion of boys playing volleyball in clogged water in ground viral video snk