Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण आवडीने डान्स करतात आणि या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एक डान्सचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये काका काकू स्टेजवर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (uncle aunty amazing dance on tauba tauba song video viral on social media)
काका काकूंनी केला जबरदस्त डान्स
या व्हायरल व्हिडीओ एका घरगुती कार्यक्रमातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला काका काकू सुंदर डान्स करताना दिसत आहे. हे काका काकू विक्की कौशलच्या तौबा तौबा या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. त्या दोघांनी डोळ्यांवर काळा चष्मा घातला आहे आणि अप्रतिम असा डान्स सादर केला आहे. हा डान्स पाहून कोणीही त्यांचे चाहते होईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
हेही वाचा : “बापरे काय चोर आहे” चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; अशी चोरी केली की VIDEO पाहून अवाक् व्हाल
kritikaneel_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “इंटरनेटवरील आवडती डान्सिंग जोडी परत आली आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एकच हृदय आहे काका काकू किती वेळा जिंकणार” तर एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम जोडी” आणखी एका युजरने लिहिलेय, “किती सुंदर डान्स केला.. हे लोक तरुणांसाठी एक प्रेरणा आहे.” अनेक युजर्सनी या डान्सवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही लोकांनी काका काकूंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अनेक वृद्ध जोडप्यांचे डान्स व्हिडीओ चर्चेत आले आहे. नेटकरी अशा व्हिडीओला अधिक पसंती देतात. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.
/