Viral Video : सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी लग्नातील डान्सचे व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी गाणी गातानाचे व्हिडीओ समोर येतात. कधी नवरदेव नवरी उखाणा म्हणताना दिसतात कधी आगळी वेगळी प्रथेचा व्हिडीओ चर्चेत येतो.सध्या असाच एका लग्नातील व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये स्टेजवर चक्क काका आणि काकू डान्स करताना दिसत आहे. काका काकूंचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. त्यांची ऊर्जा, डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही त्यांचे चाहते व्हाल. काही लोकांना त्यांचा व्हिडीओ पाहून हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन यांची आठवण येईल.

काका काकूंनी केला अप्रतिम डान्स

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. व्हिडीओत तुम्हाला स्टेज दिसेल. स्टेजवर काका काकू डान्स करत आहे. “मेरी मखना मेरी सोनिये” या बॉलीवूडमधील लोकप्रिय गाण्यावर हे काका काकू डान्स करत आहे. बागबान चित्रपटातील हे गाणं आहे. काका काकू सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. काका काकूंचा डान्स पाहून तुम्हीही त्यांचे चाहते व्हाल.
काका काकूंनी हुबेहूब हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन यांच्यासाखरा डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे. काका काकूंची ही जोडी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Anant Radhika Wedding : एमएस धोनीची अनंत-राधिकासाठी खास पोस्ट, पत्नीची काळजी कशी घ्यायची याचा सल्ला देत म्हणाला…

पाहा व्हायरल व्हिडीओ

सुशील सूर्यवंशी ( Sushil Suryawanshi) यांनी sushilsuryawanshi05 या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “७१ वर्षांचे अमिताभ ६५ वर्षांच्या हेमामालिनी..”

हेही वाचा : Viral Video: “रागावतो माझ्यावर बाप माझा, त्याला माहित्येय की..”, दुसऱ्याला आनंद देताना भरउन्हात उभ्या पितापुत्रांचा व्हिडीओ पाहून पाणावतील डोळे

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सुंदर तुमची जोडी अशीच राहू” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान डान्स केला काका आणि काकूंनी” आणखी एका युजरने लिहिलेय, “खुपचं छान काका काकु असेच आनंदी राहा” काका काकूंचा डान्स अनेकांना आवडला. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी सुद्धा शेअर केले आहेत.