Uncles dance: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. त्यात डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धापर्यंतची मंडळी सोशल मीडियावर थिरकताना दिसतात. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, तर कधी रस्त्यांवर; काही जण फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी अशा विविध प्रकारच्या डान्सचा आधार घेत असतात. तर काही जण फक्त स्वत:च्या मजा, आनंदासाठी तो क्षण एन्जॉय करत असतात.

काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’, ‘तौबा तौबा’, ‘पीलिंग्स’, ‘तांबडी चांबडी’, ‘आज की रात मजा हुस्न का…’ ही गाणी खूप चर्चेत आली आहेत. त्यावर लाखो लोकांनी बनवलेल्या रील्स पाहायला मिळत आहेत. पण, हळदीत केलेला डान्स काही औरच असतो. सगळेच आपल्याला हवं तसं हवं त्या प्रकारे नाचतात आणि त्या कर्यक्रमाचा आनंद घेतात. सध्या एका काकांचा असाच एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यामध्ये हळदीत काका अगदी बेभान डान्स करताना दिसतायत.

हेही वाचा… कोणत्याच बापावर अशी वेळ येऊ नये! पैसे नव्हते म्हणून मुलाला स्ट्रेचरवरून उचललं अन्…, पाहा काळजाला भिडणारा VIDEO

काकांचा धमाकेदार डान्स

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक काका अगदी मनसोक्त नाचताना दिसत आहेत. हळदीमध्ये बेन्जोच्या तालावर ते ठेका धरताना दिसतायत. त्यांचा हा डान्स पाहून नेटकरीही चकित झाले आहेत.

काकांचा हा व्हिडीओ @jagtap_shridhar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला “भावाने मनापासून डान्स केला” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल तीन दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… योग्य निर्णय वेळेवर घेतला की त्रास कमी होतो! भिंत कोसळणार इतक्यात कारमध्ये बसला अन्…, पाहा धक्कादायक VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “खूप सुंदर डान्स केला आहे भावाने.” दुसऱ्याने, “नाचताना कोणाचा विचार नाही करायचा, त्यात तर मजा असते,” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करीत म्हणाला, “काही पण बोला; पण या वयात येऊन असे मनमोकळेपणाने नाचलात खूपच छान.” एकाने, “काका जोमात, गाव कोमात,” अशी कमेंट केली.

Story img Loader