Uncle dances at petrol pump viral video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धापर्यंतची मंडळी सोशल मीडियावर थिरकताना दिसतात. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, तर कधी रस्त्यांवर; फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी लोक असे विविध प्रकारचे व्हिडीओ करत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’, ‘तौबा तौबा’, ‘सुसेकी’, ‘तांबडी चांबडी’, ‘आज की रात मजा हुस्न का…’ ही गाणी खूप चर्चेत आली आहेत. त्यावर लाखो लोकांनी रील्स बनवलेल्या पाहायला मिळत आहेत. दरम्यान, आता एका गाण्यावर चक्क एका काकांनी रील बनवली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एक काका पेट्रोल पंपावर बॉलीवू़ड गाण्यावर डान्स करताना दिसतायत.

हेही वाचा… रिक्षाने प्रवास करताना सुट्टयांची चिंता मिटली! रिक्षाचालकाने पेमेंटसाठी आणलाय भन्नाट जुगाड, पोस्ट होतेय VIRAL

व्हायरल व्हिडीओ

पेट्रोल पंपावर डान्स करणाऱ्या या काकांची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. काकांचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ काही दिवसांपासून तुफान गाजतोय. ‘स्त्री-२’ चित्रपटातील ‘आज की रात मजा हुस्न का…‘ या गाण्यावर व्हिडीओत काका थिरकताना दिसतायत. अभिनेत्री तमन्ना भाटियासारख्या हुबेहूब डान्स स्टेप्स फॉलो करीत काका चक्क पेट्रोल पंपावर ठेका धरताना दिसतायत.

हेही वाचा… ‘आज की रात…’, भर वर्गात दोन विद्यार्थींनींचा ‘असा’ डान्स पाहून म्हणाल, कहरच…, पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ @_umesh_mahale या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला तब्बल ५३.३ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

युजरच्या कमेंट्स

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “एक नंबर चाचा.” दुसऱ्याने, “वय हा फक्त एक आकडा आहे,” अशी कमेंट केली. एक जण मजेशीर कमेंट करीत म्हणाला, “पण, काका मी पेट्रोल भरायला आलो होतो आणि तुम्ही इथे डान्स करताय.”

हेही वाचा… पठ्ठ्याची हिंमत तर बघा! मिरवणूकीत चक्क पोलिसांसमोर केला डान्स अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “एक तरी नमुना…”

दरम्यान, व्हिडीओतील या काकांचं नाव उमेश महाले असे असून, त्यांनी याआधीही असे अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे व्हायरलदेखील झाले आहेत. इन्स्टाग्रामवर उमेश महाले यांचे एक लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uncle dances at petrol pump to aaj ki raat song in a viral video dvr