Uncle Video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्ध मंडळी सोशल मीडियावर थिरकताना दिसतात. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, तर कधी रस्त्यांवर; फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी लोक असे विविध प्रकारचे व्हिडीओ करत असतात. तर काही जण फक्त आपल्या आनंदासाठी अशा प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.

हेही वाचा… Gaurav Taneja Divorce: युट्यूबर गौरव तनेजा घेणार पत्नी रितू राठीबरोबर घटस्फोट? फ्लाईंग बीस्टने अखेर सोडलं मौन, म्हणाला, “जे माझ्यावर प्रेम…”

Little girl dance
‘आरारारा खतरनाक…’ स्केटिंग शूज घालून चिमुकलीने केला ‘पीलिंग्स’ गाण्यावर हटके डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ladies group dance on marathi song Bai Mi Patang Udvit Hote marathi old song video goes viral
“गं बाई मी पतंग उडवीत होते” महिलांनी मकरसंक्रांतीला काळ्या साड्या नेसून केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून तुम्हीही थिरकाल
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
ladies group dance on marathi song kakhet kalasa gavala valsa kashala marathi old song video goes viral
“काखेत कळसा गावाला वळसा कशाला?” जुन्या मराठी गाण्यावर महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
a young girl amazing dance on a stage Her face expression
Video : तरुणीने केला एक नंबर डान्स! चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात एका महिलेचा डान्स सुरू असताना एक काका अचानक स्टेजवर जाऊन डान्स करायला लागले आहेत.

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकता की, एक कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. या कार्यक्रमात एक महिला आपलं नृत्यकौशल्य सादर करण्यासाठी स्टेजवर आली आहे. गाणं सुरू होताच महिला थिरकायला लागते. पण, स्टेजवर उभे असलेल्या काकांना हा मोह आवरत नाही आणि तेही या गाण्यावर थिरकायला लागतात.

काका डान्स करायला लागताच एक महिला त्यांना थांबण्यास सांगते. स्टेजवर आधीच एक डान्स परफॉर्मन्स सुरू असताना काकांनी अचानक सुरू केलेला डान्स पाहून अनेक जण आश्चर्यचकित होतात. पण काही केल्या काका ऐकत नाहीत आणि डान्स सुरू ठेवतात. ‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’ हे गाणं या व्हिडीओला जोडण्यात आलं आहे.

हा व्हिडीओ @marathi_epic_jokes या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. काकांना अचानक काय झालं असेल, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. तर तब्बल २.७ मिलियन व्ह्युज या व्हिडीओला आले आहेत.

हेही वाचा… बाप की हैवान! घरात पेट घेताच लहान मुलाने घेतली वडिलांकडे धाव; पण…, पालकांच्या दुर्लक्षामुळे झालं असं काही की, VIDEO पाहून बसेल धक्का

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “काकांनी लोक काय विचार करतील हा विचार सोडून, त्यांना जे आवडत ते केलं” तर दुसऱ्याने “काकांचं काय खरं नाही”, अशी कमेंट केली. काका काय जबरदस्त डान्स करता, काका रॉक पब्लिक शॉक, काका तापले, काकांच्या अंगात मायकल जॅक्सन अशा स्वरूपाच्या अनेक कमेंट्स या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader