Viral video: एखाद्या वाहनचालकानं थोडाही नियम चुकवला, की वाहतूक पोलीस कायद्याचा बडगा उगारीत त्यावर दंडात्मक कारवाई करतात. वाहतुकीचे नियम पाळा, अतिघाई करु नका. स्वत:बरोबरच इतरांचाही विचार करा अशा सुचना आपण ऐकत असतो मात्र काही महाभाग काहीही झालं तरी ऐकत नाहीत.सोशल मीडियावर फेमस किंवा व्हायरल होण्यासाठी लोक काय करतील याचा काही नेम नाही. अशात अनेक महानग प्रसिध्दीसाठी स्वतःचा जीव देखील धोक्यात टाकतात. यातील काही जण आपल्या स्टंटमध्ये सफल होतात. तर काहींना जन्माची अद्दल घडते. अशातच तुम्ही आतापर्यंत तरुणांना चालत्या बाईकवर स्टंटबाजी करताना पाहिलं असेल मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही नक्की डोक्याला हा लावाल. कारण या व्हिडीओमध्ये चक्क एक काका उलट्या पद्धतीने बसून स्कूटी चालवत आहेत. या काकांनी असे असे स्टंट मारले आहेत की ज्यांची आपण कधी कल्पना सुद्धा करू शकणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अलीकडे लोकांचे स्टंट करण्यात प्रमाण वाढत चालले आहे. यामध्ये आधी तरुण लोक धोकादायक स्टंट करत होते आता मोठ्यांचाही यामध्ये समावेश आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक काका स्कूटीवर उलटे उभे राहून स्कूटी चालवत आहे. विशेष म्हणजे ते रस्त्यांवर गाड्यांची रहदारी सुरू आहे. त्याच वेळी ते एका पोलिस फाटकला धडकता घडकता वाचतात. तसेच टर्न घेताना देखील त्यांच्या तोल जातो. पण तरिही ते तशीच गाडी चालवतात. व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. यावेळी अपघात, दुर्घटना होण्याची भीती आहे मात्र हे काका बिंधास्त वाहतुकीचे नियम तोडून सर्रास स्टंटबाजी करत आहेत. थोडाजरी तोल गेला तरी काकांचा मोठा अपघात होऊ शकतो. या दृश्याचा व्हिडिओ तिथूनच जाणाऱ्या एका गाडीवाल्याने रेकॉर्ड केला आहे. तसेच ते त्याला प्रश्न देखील विचारत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पुणे तिथे काय उणे! मर्सिडीज कारची नंबर प्लेट पाहून व्हाल अवाक्; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “हे फक्त पुण्यातच…”

काकांना या वयात असे स्टंट करताना पाहून बहुतेक युजर्स फनी प्रतिक्रिया देत आहेत. “या वयात पडले तर महगात पडेल”, असे एका यूजरने लिहीले आहे. त्याचवेळी, एका यूजरने “असं करुन नेमकं काय मिळतं आम्हालाही सांगा” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uncle dangerous stunt on scooty video viral shocking video on social media srk