Mumbai Local Dance Video : मुंबई लोकल ट्रेन म्हटलं की, तुफान गर्दी, ट्रेनमध्ये चढण्यासाठी धक्काबुक्की, सीटवरून मारामारी, भांडणं या सर्व गोष्टी डोळ्यांसमोर येतात. पण, तरीही आज लाखो मुंबईकरांचे जीवन या मुंबई लोकलवर अवलंबून आहे. ऑफिस, शाळा, कॉलेज, कामधंद्याची ठिकाणं गाठण्यासाठी लोकं मुंबई लोकलने प्रवास करतात. याच मुंबई लोकलने प्रवास करत असताना अनेक जण डान्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ शूट करताना दिसतात, ज्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होताना दिसतात. सध्या मुंबई लोकलमधील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये काही वृद्ध काका मुंबई लोकलमध्ये ‘काटा लगा’ गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी ‘वाह क्या बात है’ अशी कमेंट करत आहेत.

विशेष म्हणजे हे काका मुंबई लोकलमध्ये स्पीकर वैगरे लावून नाही तर चक्क गाणं गातं सीटवर वाजवत ‘काटा लगा’ गाण्यावर आनंदाने नाचताना दिसतायत, त्यामुळे मुंबई लोकलमधील भांडणाचे व्हिडीओ पाहून तुम्हीपण वैतागला असाल तर तुम्ही हा व्हिडीओ एकदा पाहाच, कारण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही चेहऱ्यावर हास्य खुलेल.

मुंबई लोकलमध्ये काकांचा जबरदस्त डान्स

मुंबई लोकलमधील या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुंबई लोकलमध्ये गर्दी आहे, यावेळी ऑफिसमधून थकून भागून आलेल्या प्रवाश्यांचा एक ग्रुप प्रवास वैतागवाणा होऊ येऊ नये म्हणून जोरजोरात गाणी म्हणत नाचताना दिसतोय. विशेष म्हणजे कोणत्या स्पीकरवर वैगरे नाही तर तोंडाने गाणी म्हणत हे प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करतातय. यावेळी प्रवासी ‘काटा लगा’ या हिंदी गाण्यावर डान्स करत आहेत, तर काही जण ट्रेनमधील सीट, खिडकीवर वाजवत त्यांना साथ देत आहेत. लोकलमधील सीट्समधील मोकळ्या जागांमध्ये उभं राहून हे प्रवासी आनंदाने हात वर करून बेभान होऊन नाचतायत.

VIDEO: रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही अनेकांना वडिलांच्या आठवणीने अश्रू अनावर; लोक म्हणाले, “जगात निस्वार्थी प्रेम…”

ट्रेनमध्ये जेवण विकत घेताय? मग ‘हा’ धडकी भरवणारा Photo एकदा पाहाच; खाताना १००० वेळा कराल विचार

हा व्हिडीओ सोशल मीडियावर 1998_roadrunner नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला असून नेटकऱ्यांच्याही चांगलाच पसंतीस उतरला आहे. अनेकांनी या काकांचे कौतुक करत व्हिडीओ शेअर करण्यास सुरुवात केली आहे. तसेच काहींनी जीवनात फक्त एवढं आनंदी राहायचं आहे म्हणत त्यांच्या डान्सला दाद दिली आहे. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, ‘वाह क्या बात है साहब, मज्जा आली’, तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘जगात जर आनंदी राहायचं असेल तर तो कुठेही शोधता येऊ शकतो, माहोल बनत नाही बनवावा लागतो. यात काका स्वत:तर आनंद घेत आहेत आणि दुसऱ्यांनाही आनंद देत आहेत. ‘ तिसऱ्या युजरने लिहिले की, ‘वाइब है वाइब है’, शेवटी एकाने, ‘अशाप्रकारे आयुष्य जगता आले पाहिजे’ म्हणत या व्हिडीओवर आनंद व्यक्त केला आहे.