Viral Video : सध्या पावसाळा सुरू आहे. सगळीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस सुरू आहे. अनेक लोकांना पावसात भिजायला आवडते. पावसाळ्यात फिरायला आवडते त्यामुळे त्यांना पावसाळा हवाहवासा वाटतो. पाऊस निसर्गरम्य व सुंदर वाटतो पण प्रत्येकाला पाऊस हवाहवासा किंवा सुंदर वाटत नाही काही लोकांचा पावसाचा त्रास सुद्धा होतो. त्यांचे कामे होत नाही एवढंच काय तर पावसामुळे दोन वेळचं जेवण करता येईल एवढी कमाईसुद्धा होत नाही.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुसळधार वादळी वाऱ्याच्या पावसात एका काकांची सायकलरिक्षा उडताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

Alone tiger attacks a herd of wild gaur
‘जेव्हा वाघ जगण्यासाठी झटतो…’ एकट्या वाघाचा रानगव्याच्या कळपावर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sea Viral Video
‘आयुष्य आणि स्पर्धा..!’ भल्यामोठ्या लाटा, बोटीचा वेग, वादळ वारा; समुद्रातील ‘तो’ Video पाहून अंगावर येईल शहारा
makar sankranti birds emotional video
“पतंग नवीन खरेदी कराल; पण त्यांच्या जीवाचं काय?” मकर संक्रांतीचा ‘हा’ आनंद कोणाला तरी कायमचं दुख देऊन जातोय; पाहा हृदयद्रावक video
The tiger reached the dog through the crowd of tourists
‘मरण थांबवणं कोणाच्या हातात आहे…’ पर्यटकांच्या गर्दीतून वाघाने श्वानाला गाठलं; घटनेचा थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
tourists get stuck in frozen lake in Arunachal Pradesh
गोठलेल्या तलावावर चालताना अचानक बर्फ तुटला अन् पर्यटक अडकले, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल
do you ever see a monkey flying a kite
Video : माकडाला कधी पतंग उडवताना पाहिले का? व्हिडीओ एकदा पाहाच

वादळी पावसात काकांची सायकलरिक्षा उडता उडता वाचली

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका ठिकाणी खूप जोरदार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसात रस्त्यावर दोन ऑटोरिक्षा आणि एक सायकलरिक्षा थांबलेली आहे. व्हिडीओत पुढे दिसते की वादळी वाऱ्यामुळे सायकल रिक्षा उडते तितक्यात त्या सायकलरिक्षा चालक काका येतात आणि वेळीच सायकलरिक्षा पकडतात ज्यामुळे रिक्षा थोडक्यात वाचते. त्यानंतर काका ती सायकल रिक्षा पुढे नेण्याचा प्रयत्न करते पण वादळी वारा एवढ्या जोराचा असतो की सायकलरिक्षा जागेवरूनही हालचाल करत नाही.

हेही वाचा : Viral Video : निर्दयीपणाचा कळस! लेकरू पाणी मागत राहिलं अन् आईची अंगावर बसून अमानुष मारहाण, बुके मारले, चावली अन् जमिनीवर आपटलं डोकं

हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. काही लोक पावसाचा आनंद लुटतात तर काही लोक त्यांच्या आयुष्याशी संघर्ष करत असतात. या व्हिडीओवर लिहिलेय, “प्रत्येकासाठी वातावरण सुंदर नसते”

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : दिल्ली विमानतळावर अचानक वृद्धाला आला हृदयविकाराचा झटका; देवासारखी धावून आली महिला डॉक्टर, वेळीच CPR देऊन वाचवला जीव, Video Viral

karanvijaysharma27 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ऋतू प्रत्येकासाठी…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “गरीबी खूप रडवते भाऊ” तर एका युजरने लिहिलेय, “गरीबी पावसाबरोबर लढत राहिली आणि श्रीमंत म्हणाले, काय वातावरण आहे”

आणखी एका युजरने लिहिलेय, “दादा व्हिडीओ बनविण्यापेक्षा मदत करायला पाहिजे होती” हा व्हिडीओ पाहून अनेक लोकांनी दु:ख व्यक्त केले. काही लोकांनी व्हिडीओवर इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader