Dangerous Live Accident Video : मृत्यू कधी कोणाला सांगून येत नाही. तो कोणालाही चुकलेला नाही. अनेकदा स्वत:ची चूक नसतानाही मृत्यूला सामोरं जावं लागतं. विशेषत: रस्ते अपघातात आतापर्यंत अनेकांचा अचानक मृत्यू होत असल्याचे आपण पाहतो. रस्त्याच्या कडेने चालताना, गाडी चालविताना आपण कितीही सावधानता बाळगली तरी दुसऱ्याच्या चुकीमुळे मृत्यूचे संकट ओढवू शकते. यासंबंधीच्या उदाहरणादाखलच्या व्हिडीओनुसार काही लोक एका पदपथावर आरामात उभे होते. यावेळी एक कार भरधाव आली आणि चार जणांना उडवून निघून गेली. या दुर्घटनेमुळे क्षणाच होत्याचं नव्हतं झालं. या थरारक घटनेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजात धस्स झाल्याशिवाय राहणार नाही.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पदपथावरील एका बस स्टॅण्डवर काही लोक उभे होते; तर काही लोक आरामात चालत होते. तेवढ्यात एक भरधाव कार पदपथावर चढते आणि सर्वांना उडवून सुसाट वेगाने पुढे निघून गेली. कारची ही धडक इतकी जोरदार होती की, लोक अक्षरश: हवेत उडून खाली पडले. त्यामुळे त्यात या लोकांचा मृत्यू झाला असावा. दुर्घटनेच्या वेळी काही लोकांनी कार सुसाट वेगाने आपल्या दिशेने येत असल्याचे पाहिले होते; पण काही कळण्याच्या आणि करण्याच्या आतच ती कार लोकांना उडवून गेली. अपघाताचा हा धक्कादायक व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण, अपघाताची ही दुर्घटना कुठली आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
Two drown in Pawana Dam after boat capsizes Pune print news
बोट उलटल्याने दोघांचा पवना धरणात बुडून मृत्यू; मृतदेह शोधण्यात यश
Gas tanker blast on a Road
अशा वेळी चार हात नाही तर चार किमी दूर रहा! भर रस्त्यात गॅस टँकरचा स्फोट; थरारक व्हिडीओ होतोय व्हायरल
Truck and bike accident bike rider caught fire in telangana shocking accident video viral
ट्रकने धडक देताच दुचाकीने घेतला पेट, माणूस आगीत होरपळला अन्…, थरारक घटनेचा VIDEO व्हायरल
Three youths killed in car accident on Daryapur Akola road amravati
अमरावती: दोन कार समोरासमोर धडकल्या; तीन युवक ठार, तीन जखमी
Trailer driver dies in accident in Bhiwandi area on Mumbai Nashik highway
Thane Accident case: विचित्र अपघातात तरूणाचा मृत्यू
Video: Nearly 25 Bikes Skid In Hyderabad After Oil Tanker Spills Fuel On Kushaiguda-Nagaram Road shocking video
भयंकर! एका मागोमाग २५ बाईकचा थरारक अपघात; भर रस्त्यात असं नेमकं काय घडलं? VIDEO पाहून थरकाप उडेल

पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल

अपघाताचा हा भीषण व्हिडीओ @klip_ent नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी म्हटले, “हा एक भयानक अपघात आहे. अपघातात बळी पडलेले नक्कीच मरण पावले असतील.” तर, काहींनी म्हटले, “निळा टी-शर्ट घातलेला माणूस हा पृथ्वीवरचा सर्वांत भाग्यवान माणूस आहे. कारण कार त्याच्या जवळून गेली आणि त्याला एक ओरखडाही आला नाही.”

यामुळे रस्त्याने चालताना, वाहन चालवताना नेहमी सतर्क राहण्यास सांगितले जाते. अनेकदा लोक रस्त्याने चालताना मोबाईल वापरताना दिसतात ज्यामुळे अनेकदा ते स्वत:च्या चुकीमुळे अपघाताचे बळी ठरतात. पण काहीवेळा वाहन चालकांच्या चुकीमुळे इतरांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. या घटनेतही वाहन चालकाच्या चुकीमुळे पादचाऱ्यांना अपघाताचे बळी ठरावे लागले. हा थरारक अपघात सीसीटिव्ही कॅमऱ्यात कैद झाला आहे.

Story img Loader