Viral Video : सोशल मीडियावर अनेक थक्क करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये समुद्राच्या आतमध्ये असलेले एक सुंदर हॉटेल दिसत आहे. एका जोडप्याने हा व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. समुद्राच्या आतील जग कसं असतं, हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते पण या व्हायरल व्हिडीओत दाखवलेल्या हॉटेलमधून तुम्ही समुद्राच्या आतील दृश्य पाहू शकता. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ
या व्हिडीओत तुम्हाला एक जोडपे दिसेल आणि हे जोडपे पाण्याच्या आत असलेल्या हॉटेलविषयी माहिती सांगताना दिसतात. व्हिडीओत सुरुवातीला एक तरुण तुम्हाला हॉटेलचा रस्ता दाखवतो. त्यानंतर तो लिफ्टमध्ये जातो आणि एका सुंदर हॉलमध्ये येतो. त्यानंतर तो एक आलिशान बेडरुममध्ये जातो. खूप मोठा बेड, बसण्याची व्यवस्था, बाथरुम आणि टॉयलेट अशा उपलब्ध सुविधा दाखवतो. या हॉटेलच्या अवती भोवती समुद्र वेढलेला दिसतो. व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. पाण्यात इतके सुंदर हॉटेल पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही. या हॉटेलचे नाव द मुराका असून हे हॉटेल मालदीव येथील कॉनराड मालदीव रंगाली आयलँड रिसॉर्ट मध्ये आहे. हे हॉटेल समुद्र किनाऱ्यापासून १६ फूट खाली आहे.
karaandnate या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्हाला येथे राहायचे आहे का?” या व्हिडीओवर ३ मिलियन लोकांच्या लाइक्स आल्या असून या दिड मिलियन लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “त्यांनी हे कसं बांधले असेल.” तर एका युजरने लिहिलेय, “आपत्कालीन परिस्थितीत काय करायचं?” आणखी एका युजरने लिहिलेय,”हॉटेलचा काच फूटू शकतो आणि मला पोहता येत नाही” अनेक युजर्सना समुद्रामध्ये असे हॉटेल पाहून आश्चर्य वाटले. काही लोकांनी त्यांच्या मनातील प्रश्न विचारली आहेत.