IND vs SA Underwear Comment by Ravi Shastri: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या ३७ व्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. विराट कोहलीचे शतक, जडेजाच्या भन्नाट विकेट्स, यासगळ्याचे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या सगळ्यात माजी भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी भारतीय फलंदाज इशान किशनवर केलेल्या टिप्पणीने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
खेळादरम्यान, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर मैदानावर त्यांची भागीदारी करत असताना, किशन एका षटक सुरु असताना मध्ये जाऊन दोन्ही फलंदाजांना काहीतरी सांगून आला होता. ही घटना व्हिडिओमध्ये कैद झालीच. हा व्हिडीओ व्हायरल होत असताना यात रवी शास्त्री यांनी मस्करीत केलेली टिपण्णी ऐकून सर्वच चाहते लोटपोट होत आहेत.
शास्त्री या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देत म्हणतायत की, “रोहित शर्मा किशनला सांगतोय की जर काही चूक झाली आणि फलंदाजांपैकी एक बाद झाला तर किशनला जबाबदार धरले जाईल. “अगर ऐसा वैसा कुछ हो गया गलत संदेश देने के लिए तो चड्डी किशन की खिचेगी.”
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याबाबत बोलायचे झाले तर, भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. गिल व रोहित शर्माने चांगली सुरुवात केली पण ते दोघे लवकर बाद झाले त्यानंतर कोहली आणि श्रेयस अय्यरनेच मेन इन ब्लूला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. कोहलीने १२१ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या तर अय्यरने ८७ चेंडूत ७७ धावा केल्या. या जबरदस्त भागीदारीसह भारताने पहिल्या डावात ३२६ धावा पूर्ण करत दक्षिण आफ्रिकेला चांगले लक्ष्य दिले होते.
हे ही वाचा<< विराट कोहलीने केली मोहम्मद शमी व बुमराहची तुलना, म्हणाला “शमी जरा..”, सहकाऱ्याने सांगितलं, काय चर्चा झाली?
दुसऱ्या डावात मात्र रवींद्र जडेजाने सर्वाधिक (५) विकेट घेतल्या, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन आणि मोहम्मद सिराजने एक विकेट घेत अवघ्या ८३ धावांत दक्षिण आफ्रिकेचा संघ गुंडाळला. भारताने हा सामना २४३ धावांनी जिंकून क्रमवारीत पहिले स्थान कायम राखले आणि नाबाद आठवा विजय आपल्या नावे केला.