Unhygienic frozen matar shocking video: मटारची भाजी ही सगळ्यांची आवडती आहे. अनेक नवीन डिश बनवण्यासाठीही मटारचा उपयोग केला जातो. पण फक्त हिवाळ्यातच मटार फ्रेश मिळतात. अशा वेळी गृहिणी भरपूर मटार आणून सोलून फ्रीजरमध्ये ठेवतात. बाजारातही फ्रोजन मटर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो.तुम्हीही हेच करत असाल आणि बाजारातून फ्रोजन मटार विकत घेत असाल तर सावधान. आपण बाहेरुन सहज अने गोष्टी विकत घेतो, त्यामध्ये वस्तू असतात खाद्यपदार्थ असतात, भाज्या असतात. पण आपण कधी हा विचार नाही करत की ते कशा पद्धतीने बनवलेलं असतं. फ्रोजन मटार वापरणाऱ्या महिलांनो सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, असं म्हणत आपण आहारात सर्व भाज्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा विचार करीत असलो तरी त्याची दुसरी बाजू गंभीर आहे. कारण- भाजी मंडईभोवती अस्वच्छता वाढली आहे. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या पालेभाज्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत असून, ग्राहक भाजी घेतात की आजार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. इथपर्यंत ठीक होतं; मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून भाज्या थेट आता शेतातूनच आणायच्या का, असा सवाल उपस्थित होतोय. कारण- आता विक्रेते बाजारात बनावट भाज्याही विकत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये फ्रोजन वाटाणे कशा पद्धतीने केले जातात हे पाहायला मिळालेलं आहे. वाटाणे म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर हिरवेगार वाटाणे येतात मात्र तुम्ही खात असलेले वाटाणे प्रत्येक वेळी शेतातून आलेले हिरवेगार वाटाणे नसतात तर त्याला रंग दिलेला असतो. हो फ्रोजन वाटाणे हिरवेगार दिसण्यासाठी त्याच्यावर जी प्रक्रिया केली जात आहे ती पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वाटाण्यावर हिरवा रंग कसा शिंपडला जातो हे दिसत आहे. व्हिडिओमध्ये, आसाममधील एका युनिटमध्ये एक माणूस वाटाण्यावर प्रक्रिया करताना दिसत होता. त्याने सुरवातीला उघड्या हातांनी एका मोठ्या डब्यात भिजवलेले वाटाणे बाहेर काढले, त्यानंतर त्यावर कृत्रिम रंग टाकून ते मिक्स केलं. हा किळसवाणा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>VIDEO: आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय? जंगलात फिरताना अचानक आला वाघ; पाहा पठ्ठ्यानं कसं डोकं लावून वाचवले प्राण

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी यावर संताप व्यक्त करीत आहेत. उद्या तुमच्याबरोबर हे घडलं, तर आश्चर्य वाटायला नको, अशी प्रतिक्रिया एका युजरनं दिली आहे. हा व्हिडीओ heresmyfood या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाले आहेत.