ही शीतपेये तयार करण्यासाठी जो बर्फ तयार केला जातो, त्याच्या गुणवत्तेबाबत कुणीही शंका घेत नाही. शहरात राजरोस विकल्या जात असलेल्या दूषित बर्फामुळे अनेक जण आजारी पडत असून, अन्न आणि औषध प्रशासनाचे मात्र याकडे काणाडोळा असल्याचे चित्र आहे. बर्फाचा कारखाना ते विक्रेता असा या लादीचा प्रवास तर आणखीनंच घाणेरडा, किळसवाणा असतो. मग, असा बर्फ खाऊन तुम्ही निरोगी कसे रहाल.हा बर्फ कोणत्या दर्जाचा असतो ते खाण्यापर्वी दोनदा विचार करा…बऱ्याच बर्फ कारखान्यात दूषित पाण्यापासून बर्फ तयार करण्यात येते. सध्या असाच एक किळसवाणा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही बर्फाचं काहीही खाताना १० वेळा विचार कराल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किळसवाणा प्रकार!

हा व्हिडीओ पाहून तुमची बाहेर कुठे बर्फ खाण्याची किंवा बर्फापासून बनणारे पदार्थ खाण्याची इच्छाही होणार नाही. बर्फ बनवण्याची प्रक्रिया दाखवली आहे.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बर्फाचा चुरा प्रत्यक्षात नाल्याच्या पाण्यातून तयार केल्याचे व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे. मात्र, अनेकांनी हे खोटं म्हटलं आहे. बर्फ तयार करताना लोक त्यावर चप्पल घालून चढतानाही दिसतायेत. यामध्ये प्रथम मोठ्या पेट्यांमध्ये पाणी भरण्यात आले. त्यानंतर ते गोठवण्यात आलं. डब्यातील बर्फ काढण्यासाठी त्यावर पाणी टाकण्यात आले. व्हिडिओमध्ये हे बर्फ ट्रकवर चढवताना मजुरांनी चप्पल घातलेली स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, रासायनिक रंग, निकृष्ट दर्जाचे पाणी आणि सॅकरीनपासून गोळा व आइस कॅन्डी तयार केली जाते. वाढत्या महागाईमुळे यात मिसळणारे उच्च प्रतिचे रंग, साखर बर्फ गोळा विकणाऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. चांगल्या प्रतिचे उत्पादन तयार करताना उत्पादनाचा खर्च वाढतो. त्यामुळेच विक्रेते निम्म दर्जाचा रंग आणि सॅकरीनचा उपयोग करतात. बर्फ गोळ्याच्या स्वरूपात आजार विकत आहोत, याची कल्पना विक्रेत्यांना असते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – विमानात बसलेल्या आईला जेव्हा मुलगा पायलटच्या गणवेशात दिसतो; हृदयस्पर्शी VIDEO पाहून नेटकरी झाले भावूक

बऱ्याचदा जाणीव असूनही लोक आरोग्याकडे दूर्लक्ष करताना दिसतात. त्यातलीच गत अशा अशुद्ध पाण्यापासून बनविल्या जाणाऱ्या बर्फाच्या बाबतीत आहे. थंडपेयांचा स्वाद घेताना त्यासाठी वापरला जाणारा बर्फ कुठला, हे तपासणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unhygienic work conditions of an ice factory warns not to have ice candies video viral on social media srk
Show comments