Union Minister Nitin Gadkari Fact Check : लाईटहाऊस जर्नलिझमला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा उल्लेख करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर आढळून आली आहे. त्यात केंद्रीय मंत्र्यांनी, ब्राह्मण आजचे खरे दलित आहेत, असे विधान केल्याचा दावा करण्यात आला आहे. या विधानामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे; पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना खरंच असं कोणतं वादग्रस्त विधान केलं आहे का याविषयीचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एक वेगळंच सत्य समोरं आलं. ते काय आहे ते जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर सुयश आनंद शास्त्री यांनी त्यांच्या प्रोफाइलवर हा दावा शेअर केला आहे.

फ्रेंच पत्रकार फ्रान्सिस गौटियर यांच्या ब्राह्मण समुदायाच्या गंभीर आर्थिक आणि सामाजिक घसरणीवर प्रकाश टाकणाऱ्या अहवालाचा हवाला देऊन नितीन गडकरी यांनी ब्राह्मणांना आजचे ‘खरे दलित’ म्हणून संबोधले आहे, असा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. त्यात पुढे असे म्हटले आहे की, बरेच ब्राह्मण आता अंगमेहनती कामगार, रिक्षाचालक व घरकामगार म्हणून काम करीत आहेत आणि काही ठिकाणी तर त्यांना अस्पृश्यांसारखे वागवले जाते आहे, असेदेखील या पोस्टमध्ये म्हटले आहे.

इतर युजर्सदेखील असाच दावा शेअर करीत आहेत.

तपास :

आम्ही गूगलवर एका साध्या कीवर्ड सर्चने तपास सुरू केला. यावेळी आम्हाला २००७ मधील एक बातमी सापडली. त्यामध्ये असे म्हटलेय की, ज्या वेळी जवळजवळ सर्व राजकीय पक्ष दलित किंवा इतर मागासवर्गीयांना खूश करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत आहेत आणि ब्राह्मणांकडे दुर्लक्ष करून, त्यांच्यासाठी आरक्षणाची वकिली करीत आहेत, त्या वेळी भारतात जवळजवळ दोन दशके घालविणारे फ्रेंच पत्रकार फ्रँकोइस गौटियर यांना गैरसमजुतींवर आधारित हा पूर्वग्रहदूषित ट्रेंड वाटतो.

https://www.hindustantimes.com/india/are-brahmins-today-s-dalits-in-india/story-GUMXtPlPb3v9XYXcEXPGHP.html

त्यानंतर आम्ही नितीन गडकरी यांच्याशी संबंधित विधानावर कीवर्ड सर्च केला. यावेळी आम्हाला एक रिपोर्ट सापडला. त्यामध्ये असे म्हटले आहे की, हे विधान प्रत्यक्षात बॉलीवूड अभिनेत्री व खासदार कंगना रणौत यांनी केले आहे.

https://www.jagran.com/jharkhand/jamshedpur-kangana-ranaut-said-brahmin-of-india-is-real-dalit-in-today-s-era-21895368.html

हा अहवाल २०२१ मध्ये प्रकाशित झाला होता. कंगनाने २०२० मध्ये एक्स (पूर्वी ट्विटर)वर तिचे विचार शेअर केले होते. आम्हाला त्याबद्दलच्या काही बातम्यादेखील सापडल्या.

https://archive.siasat.com/news/kangana-pulled-up-for-her-remarks-on-caste-and-reservation-system-1956094

तिच्या टिप्पणीवर अनेक पोस्ट होत्या.

पण, मूळ पोस्ट आता एक्सवरून हटवण्यात आली होती.

तपासाच्या पुढील टप्प्यात आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या टीममधील एका सदस्याशी संपर्क साधला. त्यांनी स्पष्ट केले की, एक्सवरील व्हायरल पोस्ट खोटी आहे आणि गडकरी यांनी असे कोणतेही विधान केलेले नाही.

निष्कर्ष :

आज ब्राह्मण हेच खरे दलित आहेत, असे कोणतही विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेले नाही. हे वादग्रस्त विधान काही वर्षांपूर्वी खासदार कंगना रणौत यांनी केले होते; पण हेच विधान आता नितीन गडकरींचे असल्याचा खोटा दावा करीत व्हायरल केले जात आहे. त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.