मणिपूरसह देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान आता २८ फेब्रुवारीला होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यासाठी आता ५ मार्चला मतदान होणार आहे. शुक्रवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी भाजपच्या प्रचारासाठी राज्याची राजधानी इंफाळमध्ये पोहोचल्या. यावेळी त्यांनी महिला कलाकारांसोबत पारंपारिक नृत्यात सहभाग घेतला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
याआधी मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा बदलण्यात आल्या होत्या. मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यासाठी आता २८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. याआधी २७ फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार होते. याशिवाय मणिपूरमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तारीख बदलून ३ मार्च ते ५ मार्च करण्यात आली.
(हे ही वाचा: ऑनलाइन क्लासचा प्रभाव! मुलाने ‘या’ इंग्रजी शब्दाला दिले नवीन नाव, हा Viral Video एकदा बघाचं)
(हे ही वाचा: Viral Video: …आणि एका क्षणात पक्षांचा थवा आकाशातून खाली पडला)
मणिपूरमध्ये ६० जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. त्याचे निकाल १० मार्च रोजी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकांच्या निकालांसह घोषित केले जातील. मणिपूरमध्ये ४ मार्च आणि ८ मार्च रोजी शेवटच्या निवडणुका झाल्या होत्या. मणिपूर निवडणुकीसाठी भाजपने आदल्या दिवशी आपला जाहीरनामा इंफाळमध्ये प्रसिद्ध केला होता.