आपल्या देशात विविध देशी जुगाड करणाऱ्यांची संख्या कमी नाही. जुगाडू व्यक्ती आपली अवघड कामं सोप्पी व्हावी आणि पैशासह वेळेची बचत करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असतात आणि त्यातून मग काहीतरी भन्नाट अशा जुगाडाचा शोध लागतो. सध्या अशाच एका जुगाडशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
आजकाल अनेक बाईकप्रेमी आपल्या बाईकला वेगवेगळ्या प्रकारे सजवतात ते आपण पाहिलं आहे. ज्यामध्ये काहीजण बाईकच्या मुळच्या रंगावर आपल्या आवडीचा रंग देतात अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. मात्र, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील तरुणाने अनोख्या पद्धतीने बाईकचा लूक केला आहे जो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका मुलगा पेट्रोल भरण्यासाठी आपली अनोखी बाईक पेट्रोल पंपावर घेऊन जातो, जे पाहून तिथे उपस्थित लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. कारण या मुलाने बाईकला चक्क ट्रॅक्टरचे सायलेन्सर तर दुधासाठी वापरली जाणारी किटली पेट्रोलची टाकी म्हणून वापरली आहे. व्हिडिओमध्ये हा मुलगा त्याच्या जुगाडू बाईकवरून रस्त्यावर वेगाने जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ मागील जुना असला तरी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ ekamdhillon00 नावाच्या अकाउंटवरून इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओला आतापर्यंत ३ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर ७ लाखांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, ‘मनात आणलं तर काहीही करता येतं’ तर आणखी एका नेटकऱ्याने ‘ही बाईक तेलावर चालते की दुधावर? असा मिश्किल प्रश्न विचारला आहे.