आपल्याला एखादी व्यक्ती आवडत असेल त्या व्यक्तीसमोर भावना व्यक्त करणे यालाच प्रपोज करणे म्हटले जाते. ही गोष्ट ऐकायला जेवढी सोपी वाटते प्रत्यक्षात करायला खूप अवघड आहे. काही लोकांना लहानपणापासून एखादी व्यक्ती आवडत असते पण हे लोक आपल्या भावना व्यक्त करत नाही तर काहींना पाहताक्षणी एखादी व्यक्ती आवडतात. अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्याला पाहताक्षणी एक तरुणी आवडली आणि त्याच क्षणी त्याने तिला प्रपोजही केले. तरुणाने भररस्त्यात अगदी फिल्मी स्टाईलमध्ये तरुणीला प्रपोज केले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना थक्क केले तर अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण भरवेगात सायकल चालवत रस्त्यावरून जात आहे. तेवढ्यात रस्त्याच्याकडेला उभी असलेली तरुणी त्याला दिसते. एका क्षणाचाही विलंब न करता तो तरुणीच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरील एका खांबाला पकडतो आणि सायकल सोडून देतो अन् रस्त्यावर उडी मारून तरुणीजवळ जाऊन तिला एक फुल देतो. अचानक तरुणाने प्रपोज केल्यानंतर गोंधळलेली तरुणी तेथून निघून जाते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडिओ इंस्टाग्रामवर nusta_jal_ नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हो म्हणाला की नाही म्हणाली हे महत्त्वाचं नाही, प्रपोज खूप भारी होता हे महत्त्वाचं आहे!”
व्हायरल व्हिडीओमधील तरुणाच्या प्रप्रोज करण्याची पद्धत अनेकांना आवडली आहे. अनेकांनी तरुणाचे कौतुक केले.
प्रपोज करणाऱ्या तरुणाची अवस्थेत एकाने कमेंट केली की, “जॉबला जायची घाई आहे पण बघतो काही जमलं तर”
तरुणीने नकार दिलेला पाहून दुसरा म्हणाला की,”भावा, तुझं दुख मी समजू शकतो”
तिसरा म्हणाला, “डिस्क ब्रेक खूप कमाल आहे”