How To Get Rid Of Lizards: प्रत्येकाच्याच घरात पालींचा धुमाकूळ बघायला मिळतो. घरातील भिंतीवर पाल दिसली तरी लहानांसोबतच मोठ्यांनाही भिती वाटते. कधी कधी तर पाल अशाठिकाणी लपून बसते की तिथून तिला पळवून लावणंही कठीण होतं. घरात कितीही साफसफाई केली तरी पालींचा उपद्रव काही कमी होत नाही. घराच्या भिंतींवर पाली फिरत असतात; ज्या दिसायला खूप वाईट दिसतात. एकदा का घरात पाल शिरली, तर तिला बाहेर घालवणे फार कठीण काम वाटते. कित्येकदा अनेक प्रयत्न करूनही ती जात नाही. अशा वेळी ती जेवणात पडण्याची किंवा पदार्थ विषबाधित होण्याची फार शक्यता असते. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये एका घरात पालीला पळवण्यासाठी अशी शक्कल लढवली आहे की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक व्यक्ती पाल पकडण्यासाठी फिशिंग करताना जो गळ वापरतात तो वापरत आहे. आता तुम्ही म्हणाल मासे पकडण्याच्या गळानं पाल कशी पकडायची. मात्र या व्यक्तीने लढवलेली शक्कल पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. हा व्यक्ती पाल पकडण्यासाठी एक कीटक एका दोरीला बांधतो आणि ते पालीकडे घेऊन जातो. यावेळी पाल तो कीटक खाण्यासाठी पुढे येतो आणि हुक पालीच्या तोंडात अडकते आणि पा सहज त्याच्या जाळ्यात अडकते..हा व्हिडीओ पाहून लोक व्यक्तीनं केलेल्या जुगाडाचं कौतक करत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Video: संपत्तीसाठी लेक झाला हैवान! संपत्तीच्या वादातून मुलाची जन्मदात्याला मारहाण; हृदयविकाराच्या झटक्यानं वडिलांचा मृत्यू

हा व्हिडीओ लाफ्टरकलर्स नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत १ मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. तर व्हिडिओला १७ हजारांहून अधिक वेळा लाईक करण्यात आले आहे. यावर युजर्स कमेंट करतानाही दिसत आहेत, एका यूजरने लिहिले… ज्याला पाल आवडत नाहीत तो खूप आनंदी असेल. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…हे तंत्रज्ञान भारताबाहेर जाऊ नये. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…लोकांना अशा कल्पना कुठून येतात?