अनेक लोक असे असतात जे रस्त्यावर वाहतूक पोलिस किंवा कॅमेरे दिसले तरच वाहतूकीचे नियम पाळतात. शिवाय असे लोक पोलिसांना पाहताच हेल्मेट घालतात आणि कॅमेरा पाहून वाहनाचा वेगही कमी करतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ अशाच लोकांशी संबंधित आहे. आपल्यापैकी अनेकजण हेल्मेट सुरक्षेसाठी नाही तर दंड टाळण्यासाठी वापरतात हे सर्वांनाच माहीत आहे.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये टोपीच्या हेल्मेटचा पट्टा तुटल्यावर एका व्यक्तीने ते हेल्मेट डोक्यावर ठेवण्यासाठी असा जुगाड केला की, तो पाहून पोलीस अधिकारीही थक्क झाले आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक माणूस बाईकवर बसलेला दिसत आहे. त्याच्या हेल्मेटच्या जुगाडामुळे पोलिसांनी त्याला अडवलं, कारण हेल्मेट डोक्यावर ठेवण्यासाठी त्याने ते प्लास्टिकच्या दोरीने बांधले होतं. जे पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे.
हेही पाहा- चोरट्यांनी बुटासह अंडरवेअरमध्ये लपवलं तब्बल १.४ कोटींच सोनं; व्हायरल Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
हेही पाहा- Video: “ही आमची जमीन…” कन्नडमध्ये बोलली नाही म्हणून रिक्षा चालकाने तरुणीला खाली उतरवलं अन्…
खरं तर हेल्मेटचा पट्टा तुटल्यामुळे या व्यक्तीने हे जुगाड केलं होतं. मात्र, पोलीस अधिकाऱ्याने आधी त्या माणसाचे जुगाडू हेल्मेट काढले आणि नंतर त्याला नवीन हेल्मेट घालायला दिले. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी वाहतूक पोलिसांचे खूप कौतुक केलं आहे. तर हा व्हिडिओ पंजाबच्या लुधियाना शहरातील असल्याचा दावा केला जात आहे. तर व्हिडिओमधील पोलिस अधिकाऱ्याचे नाव अशोक चौहान असून ते ASI म्हणून कार्यरत असल्याचं सांगण्यात येत आहे.
हा व्हिडिओ @HasnaZarooriHai नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “ज्याला आपल्या जीवाची काळजी आहे, तो काहीही जुगाज करतो, नाहीतर काहीतरी बहाणा करा. शेवटपर्यंत पहा!!” आतापर्यंत या व्हिडिओला ६५ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि सुमारे २ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर अनेकजण त्यावर वेगवगेळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी व्हिडीओतील पोलिस अधिकाऱ्याचं कौतुक केलं आहे.