Viral video: लसूण हा स्वयंपाकात अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी वापरला जातो. एखाद्या पदार्थाला लसणाची खमंग फोडणी दिली तर तो अधिकच स्वादिष्ट लागतो. लसूण खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. महाराष्ट्रीयन स्वयंपाकात लसणाचा हमखास वापर केला जातो. पालेभाज्या, लोणचं, चटणीसारख्या पदार्थांमध्ये भरपूर लसणाच्या पाकळ्या वापरल्या तरच ते पदार्थ चविष्ट होतात. मात्र स्वयंपाकासाठी एवढा लसूण वारंवार सोलणं हे एक डोकेदुखीचं काम असतं. एकतर लसणाला उग्र वास येतो शिवाय लसूण सोलताना आपली बोटंही दुखू लागतात. बाजारात सोललेला लसूण विकत मिळतो. मात्र तो फारच महाग असतो. मात्र सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यामध्ये एक महिला हातही न लावता अगदी झटपट लसूण सोलत आहे. ही ट्रिक तुम्हीही ट्राय करा आणि लसूण सोलण्याचं टेंशन विसरा.
या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत सर्व प्रथम लसणाचा वरचा कठीण भाग कापून घेतला आणि तो वेगळा करण्यात आला. नंतर तुम्ही पाहू शकता हातात कटर घेऊन त्याची साल अगदी सोप्या पद्धतीने काढली. अशा प्रकारे तुम्ही लसणाची साल अगदी सहज काढू शकाल. साल काढल्यानंतर वरुन लसणाची शेंडी काढून टाका. अशा प्रकारे तुम्ही अगदी सहजरित्या लसूण सोलू शकता.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> शेवटी रक्त वाघाचं आहे; वाघाच्या पिल्लानं केली भल्यामोठ्या हरणाची शिकार, VIDEO पाहून थक्क व्हाल
तसेच आणखी काही ट्रिक वापरून तुम्ही लसूण सोलू शकता
१. सर्वप्रथम लसणाचा कांदा मोकळा करून घ्यावा. लसूण पाण्यात भिजवून थोडा नरम होतो. पण लसणाची सालं आपोआप निघायला हवी असतील तर हे पाणी थोडं कोमट करून घ्यावे . या पाण्यात थोडा बेकिंग सोडा (बेकिंग सोडा पर्यायी आहे, नाही घातला तरी चालतो.) घालून १५ ते २० मिनिट मोकळ्या केलेल्या लसूण पाकळ्या यात भिजवून ठेवाव्यात. यानंतर लसूण सोलताना नखांचा वापर करण्याऐवजी दोन बोटांच्या मध्ये पकडून चिमटीने साल काढून घ्यावी. लसणाच्या सालीचा बारीक थर राहिला असल्यास तो हातांनी चोळून बाजूला काढावा.
२. लसूण सोलणं ही कंटाळवाणी गोष्ट असल्यामुळे तुम्हाला ते सहज सोलून मिळावे असं वाटत असतं. मायक्रोवेव्हमध्ये लसूण सोलणं अगदी सोपं आहे. यासाठी मायक्रोवेव्हमध्ये ३० सेकंदासाठी लसूण ठेवा. ज्यामुळे ते अगदी पटकन सोलले जातील.