Viral wedding card: लग्नात काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो. यात लग्नपत्रिकाही अपवाद नाही. कधी लग्नपत्रिकाच विचित्र असते तर कधी त्यातील मजकूर. अशा कितीतरी लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यात आता आणखी एका लग्नपत्रिकेची भर पडली आहे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत बऱ्याच लग्नपत्रिका व्हायरल झाल्या आहेत. आतासुद्धा अशाच एका कार्डनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या लग्नपत्रिकेच्या शेवटी एक सूचना देण्यात आली आहे.एका लग्नपत्रिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

प्रत्येकजण लग्न करतो, परंतु प्रत्येकाचे लग्न प्रसिद्धीच्या झोतात येत नाही. केवळ अशाच लोकांची लग्नं (Wedding) चर्चेत येतात, जे एकतर श्रीमंत किंवा सेलिब्रिटी आहेत. अशातच, लोक त्यांचे लग्न प्रसिद्ध करण्यासाठी काहीही करू लागले आहेत. काही लोक लग्नात पैसे खर्च करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करतात, तर काहींना खास ठिकाणी लग्न करून जगाच्या नजरेत यायचे असते. तसे, आजकाल चर्चेत येण्याचा आणखी एक मार्ग खूप प्रचलित आहे आणि तो म्हणजे लग्नपत्रिका. लोक त्यांच्या लग्नाची पत्रिका अनोख्या पद्धतीने छापत आहेत. आजकाल अशीच एक लग्नपत्रिका सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जी पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

तुम्ही लग्नपत्रिकेत पाहिलं असेल पत्रिकेच्या शेवटी पाहुण्यांसाठी खास सूचना असतात. यात शक्यतो भांड्यांचा आहेर आणू नका, असं तर तुम्ही पाहिलंच असेल पण या लग्नपत्रिकेत मात्र काही वेगळंच लिहिलं आहे. या लग्नपत्रिकेवर दिलेल्या पत्त्यानुसार उत्तर प्रदेशमधील एटा येथील जलसेर या गावात हे लग्न आहे. रोहित आणि रजनी यांच्या लग्नाची ही पत्रिका आहे. उपेंद्र, रजनी, इम्रान, दलवीर आणि राजेश या पाच जणांना या पत्रिकेच्या माध्यमातून लग्नाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. पण या पत्रिकेवर एक महत्वाची सूचना देखील आहे. अन् या सूचनेमुळेच ही पत्रिका सध्या इंटरनेटवर व्हायरल होतेय.

‘सौरव दिसताच त्याला हाकलून द्या’

आता तुम्ही म्हणाल असं काय लिहलंय? तर या पत्रिकेवर “सौरवला निमंत्रण दिलेलं नाही. लग्नात त्याची उपस्थिती अमान्य आहे. जर तो मांडवाच्या आसपास जरी दिसला तरी कृपया त्याला हाकलून द्या.” अशा आशयाचा खास मेसेज या पत्रिकेवर देण्यात आला आहे. त्यामुळे ही पत्रिका वाचून पाहुणेही घाबरले असून लग्नाला जायचं की नाही असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.

पाहा अनोखी लग्नपत्रिका

हेही वाचा >> “बाळांनो आयुष्य म्हणजे खेळ नाही रे” सेल्फी घेण्यासाठी ट्रॅकच्या बाजूला उभा राहिला, पण मागून मृत्यू धावत आला; थरारक VIDEO

ही लग्नपत्रिका पाहून लोक काहीजण आश्चर्यचकित झाले होते. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरही या लग्नपत्रिकेची खूप चर्चा होत आहे.