तुम्ही टाईम मशीन बद्दल ऐकले असेल. या टाईम मशीनचा वापर करून तुम्ही एकतर भविष्यात तरी जाऊ शकता किंवा भूतकाळात तरी. या झाल्या चित्रपटातल्या कथा. पण असा प्रसंग प्रत्यक्षात घडला आहे. १ जानेवारी २०१७ ला शंघाई मधून निघालेले युनायटेड एअरलाइन्सचे विमान सॅन फ्रॅन्सिस्कोला चक्क ३१ डिसेंबर २०१६ ला पोहोचले. त्यामुळे एकतर एकाच वेळी दोन वर्ष अनुभवायाचा दुर्मिळ योग या प्रवाशांना मिळाला पण त्याचबरोबर दोनदा नवीन वर्ष साजरे करण्याची संधीही त्यांना मिळाली.
Viral Video : अबब! या वाहतूक कोंडीला म्हणायचे तरी काय
शंघाईमधून सॅन फ्रॅन्सिस्कोला जाण्यासाठी युनायटेड एअरलाईन्सचे UA८९० हे विमान १ जानेवारीला निघाले. शंघाईपासून ते सॅन फ्रॅन्सिस्कोला जाण्याचे अंतर हे ११ तास ५ मिनिटांचे आहे. या विमानाने १ जानेवारीला सॅन फ्रॅन्सिस्कोसाठी उड्डाण केले. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की १ जानेवारीला निघालेले विमान हे ३१ डिसेंबर २०१६ ला कसे काय पोहचले. खर तर यांचे साधे उत्तर आहे ते म्हणजे वेळ. शंघाई शहराची वेळ ही सॅन फ्रॅन्सिस्कोपेक्षा १६ तासांनी पुढे आहे. त्यामुळे जरी येथे १ जानेवारी उजाडला असला तरी तिथे मात्र ३१ डिसेंबर होता. त्यामुळे २०१७ मध्ये निघालेले विमान २०१६ मध्ये पोहोचले.
Viral : कॉपीला आळा घालण्यासाठी चिनी शिक्षकांनी शोधला रामबाण उपाय