Plane Shocking Video Viral : विमानातील प्रवाशांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्याशिवाय अनेकदा अशा काही घटना घडतात की, ज्याने प्रवाशांमध्ये भीती वा गोंधळाचे वातावरण निर्माण होते. सध्या विमानातील अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक प्रवासी भरविमानात असे काही कृत्य करतोय की, ते पाहून प्रवासी तर घाबरलेच; पण हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्य व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. या घटनेनंतर संबंधित प्रवाशाच्या विमान प्रवासावर आता कायमची बंदी घालण्यात आली आहे.

प्रवासी सीटवर चढला अन् केलं असं काही की झाले सर्व शॉक

h

h

व्हिडीओमध्ये एक प्रवासी सीटवरून अचानक उठला. त्यानंतर त्याने सीट तोडण्यास सुरुवात केली. प्रवाशाचे ते विचित्र वागणे पाहून इतर प्रवासी आणि क्रू मेंबर्सदेखील घाबरले. पण, नंतर बेफाम झालेल्या त्या प्रवाशाला कसे तरी रोखण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, हुडी आणि स्वेट पँट घातलेला एक माणूस त्याच्या सीटवर उभा राहून जोरजोरात लाथा मारून आपलीच सीट तोडतोय. तो असे करत असताना इतर प्रवासी मात्र आश्चर्यकारकपणे फक्त पाहत होते. ही घटना १२ नोव्हेंबर रोजी ऑस्टिनाहून लॉस एंजेलिसला जाणाऱ्या युनायटेड एअरलाइन्सच्या फ्लाइट ५०२ मध्ये घडली. यावेळी जी गीनो गॅलोफारो नावाच्या दुसऱ्या प्रवाशाने आपल्या कॅमेऱ्यात ही घटना रेकॉर्ड केली.

हेही वाचा – पाऊल थकलं न्हाई! आजी-आजोबांचं ‘असं’ प्रेम मिळायला नशीब लागतं; VIDEO पाहून पाणावतील डोळे

u

u

प्रवाशाने लाथा मारुन सीट तोडण्याचा केला प्रयत्न

‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या वृत्तानुसार, सॅन दिएगोचे रहिवासी गॅलोफारो यांनी सांगितले की, लॉस एंजेलिस येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याच्या सुमारे एक तास आधी त्यांना मोठ्या आवाजामुळे जाग आली. यावेळी विमानात एक प्रवासी पायाने सीट तोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांना दिसले. अखेर त्यांनी इतर दोन लोकांच्या मदतीने त्या प्रवाशाला रोखले. पण, त्यानंतरही तो प्रवासी तशाच प्रकारचे कृत्य करण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा लोकांनी त्याला झिप टाय वापरून सीटवर बांधले. घटनेच्या वेळी प्रवासी मद्यधुंद अवस्थेत होता, असा अंदाज बांधला जात आहे.

‘युनायटेड एअरलाइन्स’च्या प्रवक्त्याने सांगितले की, विमान उतरल्यानंतर स्थानिक कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेने विमानाची तपासणी केली आणि त्या प्रवाशाला ताब्यात घेतले. तसेच त्याच्यावर भविष्यात सर्व विमानांतून प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली. मात्र, प्रवाशाने असे कृत्य का केले ते अद्याप समजू शकलेले नाही.