Viral video: मुली-मुलींमध्ये होणारी भांडणं काही नवी नाही. मुलींच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मुलांचे दोन गट चक्क एका मुलीसाठी भिडल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावर सार्वजानिक ठिकाणी भांडणाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. तुम्ही अनेकदा नवरा बायको किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचे आपआपसातील भांडणाचे व्हिडीओ पाहिले असेल पण तुम्ही कधी दोन मुलांचे गट एकाच मुलीसाठी भांडण करत आहे, असे कधी पाहिले का? सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एखाद्या तरुणीवर किती तरी तरुण प्रेम करतात. पण त्यांच्यामध्ये त्या तरुणीसाठी जणू स्पर्धाच लागते. ती आपलीच होणार असं चॅलेंचही तरुण एकमेकांना देतात आणि तिला मिळवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात. असेच दोन तरुण एका तरुणीसाठी आपसात भिडले.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ हा एका विद्यापीठाचा आहे. कॉलेजमधील मुलांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की मोठ्या संख्येने मुलं एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये एक तरुण दिसत आहे जो त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करत आहे पण त्या मुलीसगळे तरुण एकमेकांना मारहाण करत आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये ही मारामारी एका मुलीवरुन झाल्याचं बोललं जात आहे
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन समोरासमोर आल्या; लोक रुळावर उतरुन पळाले
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @gharkekaleshया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.