सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर बरेच ॲक्टिव्ह असतात. आनंद महिंद्रा ट्वीटच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील माहिती देत असतात. आनंद महिंद्रा उद्योगपती म्हणून प्रसिद्ध असतानाच सोशल मीडिया ॲप एक्सचे (ट्विटर) ॲक्टिव्ह युजर म्हणूनही प्रसिद्ध आहेत. आज त्यांनी एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आनंद महिंद्रा यांच्यासारखा दिसणारी एक हुबेहूब व्यक्ती आहे. तसेच त्यांनी या फोटोला अगदी मजेशीर कॅप्शनसुद्धा दिली आहे.
एक्स (ट्विटर) युजर @pjdaddyofficial या तरुणाने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आपल्या मित्राचा फोटो शेअर केला आहे. खास गोष्ट अशी की, तरुणाच्या मित्राचा चेहरा सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्यासारखा आहे. हा फोटो पोस्ट करीत युजरने कॅप्शन लिहिलीय की, आनंद महिंद्रा @anandmahindra या व्यक्तीला पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. पुण्यात राहणारा माझा सहकारी मित्र अगदीच तुमच्यासारखा दिसतो. सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या व्यक्तीचा फोटो एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा.
पोस्ट नक्की बघा :
आनंद महिंद्रांसारखी हुबेहूब दिसणारी व्यक्ती :
एक फोटो शेअर करण्यात आला आहे. फोटोत पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट घातलेली एक व्यक्ती आहे; जिचा चेहरा अगदीच आनंद महिंद्रा यांच्यासारखा आहे. तसेच आनंद महिंद्रानी या युजरची पोस्ट पाहून आपल्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून ही पोस्ट रिपोस्ट केली आहे आणि फोटो शेअर करीत, असं दिसतंय की, कदाचित लहानपणी आम्ही एखाद्या जत्रेत हरवलो असू, अशी मजेशीर कॅप्शनही दिलीय.
सोशल मीडियावर हा फोटो @anandmahindra आणि @pjdaddyofficial यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक नेटकरी हा फोटो पाहून आश्चर्य व्यक्त करीत आहेत. तर काही जण सेम टू सेम (Same To Same), जुळे भाऊ, डिजिटल जुळे भाऊ (Digital Twin) अशा अनेक मजेशीर कमेंट्स फोटोखाली व्यक्त करताना दिसून आले आहेत.