Urfi Javed Latest Video Viral : मॉडेल उर्फी जावेद नेहमीच तिच्या बोल्डनेस आणि अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते. हटके कपडे घालून प्रकाशझोतात आलेल्या उर्फीचे नवनवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लोकांचं मनोरंजन करण्यात उर्फी माहिर आहे. बिकीनी स्टाईलचे कपडे घालून बोल्ड अंदाजात राहणाऱ्या उर्फीच्या नव्या व्हिडीओची तुफान चर्चा रंगली आहे. कारण ती आता हटके कपड्यांमुळे नाही, तर कुरकुरे चिप्समुळे चर्चेत आली आहे. कारण कुरकुरे खाण्याआधी उर्फीने किचनमध्ये जे काही केलं ते पाहून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओत उर्फीने चिप्स खाण्याच्या पद्धतीबद्दल सांगितलं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, उर्फी कुरकुरेचा पॅकेट उघडते आणि एका गाळणीत कुरकुरे ठेवून ते पाण्यात धुवते. पाण्यात कुरकुरे धुतल्यानंतर उर्फी ते एका कपमध्ये घेते आणि कुरुकुरे खातानाचा अनुभव सांगते. व्हिडीओत उर्फीनं म्हटलंय की, “कुरकुरे पाण्यात धुतल्यानंतर त्यात असलेलं मसाल्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यानंतर ते खायला चविष्ट वाटतात.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ

नक्की वाचा – Video: सर्वात मोठ्या किंग कोब्राला पकडायला जंगलात गेला, शेपटीला हात लावताच अंगावर धावला अन् जे घडलं…

इथे पाहा व्हिडीओ

मी लहानपणापासूनच कुरकुरे पाण्यात धुतल्यानंतर खाते. कुरकुरे खाण्याची ही पद्धत खूप चांगली आहे, असं मला वाटतं.” उर्फीने ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केल्यानंतर व्हायरल झाली. या पोस्टला आतापर्यंत १४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. मात्र, नेटकऱ्यांनी उर्फीला पुन्हा एकदा ट्रोल केलं आहे. उर्फीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

उर्फीला ट्रोल करत नेटकरी म्हणाले…

उर्फीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, ‘तू कुरकुरेच्या पॅकेटचाही नवीन आऊटफिट बनवत आहेस, कुरकुरेचा वापर करून नवीन भन्नाट काहितरी करत असशील, असं मला वाटलं. दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं, ‘हे काहीतरी नवीन आहे, जे अजिबातच स्विकारू शकत नाही.’ अन्य एक नेटकरी म्हणला, ‘गोपी बहू तू आहेस का’? ‘या पोस्टमुळे नाराज झालो आहे, असंही एकाने म्हटलं आहे.

Story img Loader