शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर आणि इथले शिक्षक विद्यार्थी आणि समाज घडवत असतात. घरात आईवडील तर शाळेत शिक्षक मुलांवर संस्कार करत असतात. पण याच ज्ञानाच्या मंदिरात शिक्षिकांनीच विद्यार्थ्यांसमोर धक्कादायक कृत्य केलं आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी आपापसात हाणामारी केल्याची घटना घडली आहे. बिहार मध्ये सरकारी शाळेत शिक्षक-शिक्षिका एकमेकांत भिडले असल्याची एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्याचा व्हिडीओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता महिला शिक्षक आणि पुरुष शिक्षक या दोघांमध्ये वाद सुरु आहे, या वादाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं आहे. ही घटना गोपालगंज च्या अहियापूर मिडिल स्कूल मधील आहे. शिक्षकांच्या या हाणामारीमध्ये विद्यार्थी मात्र निमुटपणे हा सारा प्रकार पाहत होते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसमोरच हा प्रकार घडला, बघे ही जमले. त्यांनी या हाणामारीचे फोटो काढले. मोबाईलवर चित्रण केले. ते वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले. या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या शिक्षकांची बदली करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

hinganghat zilla parishad
वर्धा : निलंबित शिक्षक पुन्हा निलंबित…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Teacher surprise class XII students
१२ वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षिकेने दिला खास निरोप; डोळ्यांत पाणी आणेल इतका सुंदर क्षण; VIDEO चा चुकूनही चुकवू नका शेवट
Bopapur school, Bopapur teacher suspended ,
अजबच! दोन शिक्षक मारामारी करतात आणि विद्यार्थ्यास बदडतात, अखेर निलंबित ?
Father Disappointed After Seeing Daughters English In Whatsapp Chat Viral on social media
PHOTO: वडिलांनी मुलीला ४० हजार पाठवल्याचा मेसेज केला; यावर मुलीचा रिप्लाय पाहून वडिल झाले शॉक; व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
Shocking video of two female students did weird act in government school viral video on social media
अचानक वर्गातून उड्या मारल्या आणि मैदानात लोळू लागल्या, सरकारी शाळेत विद्यार्थीनींचं विचित्र कृत्य! VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Little boy crying a school telling teacher about fathers abuse and asking not to beat video viral on social media
“मग माझ्या बापालाच फोन करा की…”, ढसाढसा रडत शाळेतील मुलाची शिक्षिकेकडे विनवणी; VIDEO मध्ये पाहा चिमुकल्याचं नेमकं म्हणणं काय?
teacher Dance with students
भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थिनींसह ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांना आली शाळेची आठवण

पाहा व्हिडीओ

हेही वाचा VIDEO: दारुच्या नशेत लोकांच्या अंगावर घातली गाडी; नशा उतरल्यावर पोलिसांनी त्याच ठिकाणी नेलं आणि धु-धू धुतलं

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे. काहींनी तर या शिक्षकांना नोकरीवरुन काढून टाकण्याची मागणी केली आहे. दुसऱ्या युजरने प्रतिक्रिया देताना, शिक्षकच जर असे वागले तर मुलांवर काय संस्कार होणार असा सवाल केला आहे.

Story img Loader