अनेक दिवसांपासून विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असलेल्या यूपी बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल लागला आहे. हा निकाल लागल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा अक्षरश: पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. या निकालाशी संबंधित अनेक मजेदार मिम्स नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. काही मुलं चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहेत, तर काहींना कमी गुण मिळाल्यामुळे घरच्यांच्या रागाला सामोरं जावं लागणार आहे.
अशा परिस्थितीत मुलांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागेल याच्याशी संबंधित मिम्स सोशल मीडियावर मजेदार मिम्स व्हायरल होत आहेत. जे पाहिल्यानंतर तुम्हीही पोट धरुन हसाल यात शंका नाही. चला तर पाहूया नेटकऱ्यांनी दहावी आणि बारावीच्या निकालानंतर काय मिम्स बनवली आहेत.
हेही पाहा- लग्न समारंभातील अतिउत्साह जवानाच्या जीवावर बेतला; तोंडात रॉकेट लावलं आणि क्षणात होत्याचं नव्हत झालं!
निकालाच्या दिवशी नातेवाईकांकडून विद्यार्थ्यांना निकालाबाबत अनेक प्रश्न विचारले जातात. याबाबत एका यूजरने ट्विट केले आहे. त्यांने लिहिले आहे, ‘आज माझे नातेवाईक, काय झाले, नापास झाला की पास, किती टक्के मिळाले असे अनेक प्रश्न विचारायला सुरुवात करतील, असं म्हणत त्याने रागवलेली इमोजीदेखील या ट्विटमध्ये दिली आहे.
पालकांकडूनन गुणवत्तेनुसार बक्षीस देणार –
संजना नावाच्या युजरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘आज यूपी बोर्डाचा निकाल लागणार आहे. गुणवत्तेनुसार पालकही बक्षीस देतील. त्याने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये टेबलावर बॅट, वायपर, झाडू आणि बॅडमिंटन अशा वस्तू ठेवल्या आहेत. शिवाय किती टक्क्यांना कोणतं बक्षीस हे देखील ट्विटमध्ये दाखवण्यात आलं आहे.
मात्र काही नेटकऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. अभिषेक नावाच्या युजरने लिहिले, ‘जे बॅकबेंचर्स आहेत, त्यांनी निकालामुळे निराश होऊ नये. अशा मुलांनीच विकास केला आहे, याचा इतिहास साक्षीदार आहे. त्यामुळे सध्या पास झालेल्या आणि नापास झालेल्या मुलांशी संबंधित अनेक ट्विट व्हायरल होत आहेत. जी पाहून नेटकऱ्यांच चांगल मनोरंजन होत आहे.