Shocking Video: लोकल ट्रेन किंवा पॅसेंजर ट्रेनमध्ये प्रवेश करताना किंवा गाडीतून खाली उतरत असताना नागरिक अनेकदा घाई करतात आणि त्यामुळे अनेकदा अपघात घडतात. नेहमीच रेल्वे स्थानकात प्रवाशांना काळजी घेण्याच्या सूचनाही केल्या जातात. मात्र, असे असतानाही नागरिक आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वेतून खाली उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करतात. आता असाच एक प्रकार कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनवरुन समोर आला आहे.कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर घडलेल्या एका नाट्यमय घटनेत एका रेल्वे कॉन्स्टेबलने एका महिलेला मृत्यूपासून वाचवले. आपल्या कुटुंबासह कानपूर ते दिल्ली असा प्रवास करत असलेली ही महिला प्लॅटफॉर्म एकवरून ट्रेनमध्ये चढली पण तिची मुले मागे राहिली. आपल्या मुलांना मदत करण्याच्या हताश प्रयत्नात, ती मदतीसाठी ओरडत चालत्या ट्रेनमधून थेट रुळावर पडली. या थरारक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आपल्या मुलांना मदत करण्याच्या हताश प्रयत्नात, महिला मदतीसाठी ओरडत चालत्या ट्रेनमधून बाहेर पडली. तिच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी दोन रेल्वे पोलिस ट्रेनच्या बाजूने धावत असताना एका व्हिडिओमध्ये तो क्षण कैद झाला. दुर्दैवाने, महिलेचा तोल गेला आणि चालत्या डब्याने ओढत ती ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडली. पण काही सेकंदातच कॉन्स्टेबल अनूप कुमार प्रजापती यांनी महिलेला वर खेचले आणि तिला वाचवण्यात यशस्वी झाले. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, इन्स्पेक्टर शिव सागर यांनी कॉन्स्टेबलच्या शौर्याचे कौतुक केले, तर महिलेच्या कुटुंबाने तिचे प्राण वाचवल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले. त्यानंतर महिला प्रवाशाला पुढील वैद्यकीय उपचारासाठी छपरा रेल्वे स्थानकावरील रुग्णालयात नेण्यात आले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: ज्या गाडीचं वडिलांनी आयुष्यभर स्वप्न पाहिलं…मुलानं तिचं गाडी गिफ्ट केली; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहून डोळ्यांत येईल पाणी

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नटकऱ्यांनी या कॉन्स्टेबलचे कौतुक केले आहे. तसेच प्रवाशांनी उशीर झाला तरी चालेल मात्र धावत्या लोकलमध्ये चढू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी एक घटना घडली त्यामध्ये आम्रपाली एक्स्प्रेस क्रमांक १५७०८ च्या सामान्य डब्यात प्रवास करत असताना, ७० वर्षीय प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला आणि टीटीईने तात्काळ सीपीआर दिला आणि प्रवाशाचे प्राण वाचवले. टीटीईच्या तत्पर कारवाईचे कौतुक करत रेल्वे मंत्रालयाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.