एखादं हेलिकॉप्टर रस्त्यावर धावत असल्याचं तुम्हाला कोणी सांगितलं तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. कारण, हेलिकॉप्टर रस्त्यावर धावत नाही तर ते हवेत उडतं हे वास्तव आहे. मात्र, सध्या एका कारपेंटरने असं हेलिकॉप्टर तयार केलं आहे जे रस्त्यावर धावतं पण तुम्हाला हवेतून प्रवास करत असल्याचा अनुभन देतं.
उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यात राहणाऱ्या एका कारपेंटने हेलिकॉप्टरसारखी दिसणारी एक कार डिझाईन केली आहे. त्याला ही कार तयार करण्यासाठी खूप वेळ लागला. मात्र, त्याची कार तयार होवून जेव्हा रस्त्यावर धावायला लागली तेव्हा पाहणारे लोक चक्रावून गेले. कारण, ही कार आहे की हेलिकॉप्टर हे ओळखणं लोकांना अवघड जात आहे. शिवाय या कारपेंटरने बनवलेले हेलिकॉप्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
हेही वाचा- व्यक्तीने ऑर्डर केला १ लाख २० हजारांचा Macbook Pro, हाती जे आलं ते पाहून म्हणाला, “पुन्हा…”
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, आझमगडमधील एका कारपेंटने नॅनो कारचे हेलिकॉप्टरमध्ये रूपांतर केले असून ते हेलिकॉप्टर रस्त्यावर धावते. मात्र, त्यातून प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना हवाई प्रवासाचा अनुभव देते. या कारपेंटरचे नाव सलमान असं आहे. सलमानने सांगितलं की, मी बनवलेले हेलिकॉप्टर हवेत उडत नाही पण त्यातून प्रवास करणाऱ्या लोकांना ते हवेतून प्रवास असल्याचा अनुभव येतो.
हेही वाचा- एलॉन मस्क ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा देणार; स्वत:च केलं जाहीर, पण घातली ‘ही’ अट; ट्वीट व्हायरल!
आपणाला रस्त्यावर धावणारे हेलिकॉप्टर बनवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागला असून त्याची किंमत सुमारे 3 लाख रुपये आहे. या हेलिकॉप्टरला सध्या खूप मागणी आहे. हे हेलिकॉप्टर तयार करण्यासाठी नॅनो कार खरेदी केली आणि मग ते कसे बनवता येईल यावर काम सुरू केले होते. आता ते हेलिकॉप्टर तयार झाले असून या हेलिकॉप्टरचा अनुभव घेण्यासाठी अनेक नागरिक मोठ्या संख्येने जमत असल्याचंही सलमानने सांगितलं.
हवा आणि पाण्यावर चालणारे हेलिकॉप्टरही बनवू शकतो –
सलमानने बनवलेले हेलिकॉप्टर पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तर आपण बनवलेले हेलिकॉप्टर भाड्याने देण्यास तयार असल्याचं सलमानने सांगितलं आहे. या हेलिकॉप्टरचा वापर लग्नासारख्या समारंभातही करु शकतो. शिवाय ज्यांना हेलिकॉप्टरमधून प्रवास करता येत नाही ते या कारमधून हवाई प्रवासाचा अनुभव घेऊ शकतात असं लोकांचे म्हणणे आहे. दरम्यान ‘जर सरकार आणि कंपन्यांनी मदत केली तर आम्ही पाणी आणि हवेवर चालणारी हेलिकॉप्टरही बनवू शकतो.’ असा दावा सलमानने केला आहे.