उत्तर प्रदेशातील बांदा येथील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, ज्यामध्ये एका तरुणाचा मृतदेह झाडाला लटकवलेल्या स्थितीत आढळला आहे. मृत तरुणाच्या प्रेयसीने त्याच्याशी बोलण्यास नकार दिल्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे.

बांदा येथे एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, प्रेमप्रकरणातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. शिवाय मुलाच्या प्रेयसीने बोलण्यास नकार दिला म्हणून मृत तरुण तणावात असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, मृत तरुणाच्या नातेवाइकांनी गावातील अनेकांवर खुनाचा आरोप केल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. शिवाय या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणीदेखील मृत मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे.

हेही वाचा- घटस्फोटानंतर बायकोला त्रास देण्यासाठी नवऱ्याची अनोखी चाल; चक्क ७ पोती नाणी घेऊन गेला, पण कोर्टाने त्यालाच घडवली अद्दल

ही घटना कालिंजर पोलीस स्टेशनच्या रुणखेरा गावातील आहे. येथे राहणाऱ्या तरुणाचा मृतदेह नाल्याजवळील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तर मुलाच्या कुटुंबीयांनी मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह झाडाला लटकवल्याचा आरोप केला आहे. शिवाय मृतकाच्या नातेवाइकांनी पोलिसांना मृतदेह काढण्यास नकार दिला होता.

५ महिन्यांपूर्वी मुंबईहून घरी आला होता –

हेही वाचा- तब्बल २ वर्ष पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिला अन् जेव्हा ५८ लाखांचं बिल आलं तेव्हा चक्क…

पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात, मृत तरुणाचे एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते, तरुणी बोलण्यास नकार देत होती, त्यामुळे तो मानसिक तणावात होता, शिवाय याच कारणावरुन त्या दोघांमध्ये मोठा वाद झाला, ज्यामुळे तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं संशय आहे. तर मृत तरुण ५ महिन्यांपूर्वी मुंबईहून त्याच्या घरी परतला होता.

या प्रकरणी एसपी अभिनंदन यांनी सांगितले, “कालिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून या तरुणाचे एका मुलीसीबरोबर प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये काहीतरी वाद झाल्याचा अंदाज आहे. या वादामुळे मुलीने बोलण्यास नकार दिला, ज्यामुळे तरुणाने स्वत:चं आयुष्य संपवल्याची शक्यता आहे. शिवाय या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.”