UP Election 2022 Result: २०२२ च्या निवडणुकीच्या निकालांची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली. तेव्हाच यूपीमध्ये ईव्हीएम मशीनवरून गोंधळ उडाला आहे. विरोधी समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये बेकायदेशीरपणे ईव्हीएम हलवल्याचा आरोप करत राज्य निवडणुकीतील मतमोजणीच्या अवघ्या ४८ तास आधी, त्यांच्या पक्षाने ट्विट केले. अधिकार्याने ऑन-कॅमेरा मशीन लॅप्स झाल्याचेही मान्य केले. एसपींच्या आरोपानंतर ईसीने उत्तर दिले की ईव्हीएम ट्रेनिंग हेतूने हलविण्यात आले होते. एएनआयच्या वृत्तानुसार, निवडणूक आयोगाने (EC) बुधवारी वाराणसीचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी एनके सिंह यांनाही निलंबित केले.
यूपी निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी वाद सुरू झाला आणि त्यामुळेच ट्विटरवर #EVM ट्रेंड करायला सुरू झाले आणि नेटिझन्सने यावर भन्नाट मीम्स बनवायला सुरुवात केली.
नेटिझन्सने तयार केलेल्या या भन्नाट मिम्सवर तुमचं काय मत आहे?