लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. मात्र लग्नाबाबत अनेकदा विचित्र गोष्टी ऐकायला मिळतात. सध्या उत्तर प्रदेशातील एका लग्नाबाबत अजब प्रकार समोर आला आहे, जो ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. गाझीपूर जिल्ह्यातील सैदपूर भागात एका समारंभात पतीला भारताच्या सध्याच्या पंतप्रधानांचे नाव विचारण्यात आले, पण या प्रश्नाचे उत्तर न देता आल्याने पत्नीने तडकाफडकी असा काही निर्णय घेतला, जो ऐकून सारेच चकित झाले. ही घटना ११ जून रोजी सैदीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नसीरपूर गावात घडली आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

शिव शंकर या तरुणाचा रंजना नावाच्या मुलीशी विवाह निश्चित झाला होता. तेव्हापासून दोघे एकमेकांशी फोनवर बोलत होते. यानंतर दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली होती. नवरदेव शिवशंकर बॅण्ड बाजा अन् वरात घेऊन रंजनाच्या घरी पोहोचला. दोघांचे ठरल्या मुहूर्तावर रीतीरिवाजानुसार लग्न पार पडले.

What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
News BJP
BJP : भाजपा निवडणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष, कुठल्या खास निकषांवर होणार निवड?
devendra fadnavis chhagan bhujbal ajit pawar
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले, “छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही त्यामागे…”
Revenue Minister Chandrasekhar Bawankule said amending Revenue Act for societys poorest is necessary
नवे महसूल मंत्री म्हणतात, महसूल कायद्यात सुधारणा आवश्यक
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “अरे गप्प बसा ना बाबा”, खाते वाटपाबाबत प्रश्न विचारताच अजित पवार संतापले
Dilip Walse Patil :
Dilip Walse Patil : “१५०० मतांनी निवडून आलोय अन् काय सांगू मला मंत्री करा?”, दिलीप वळसे पाटलांचं विधान चर्चेत

२४ वर्षीय तरुणीवर रस्त्यात भरगर्दीत अत्याचार करून हत्या; भयंकर Video ची खरी बाजू आली समोर…

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी झाले असे काही की…

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी खिचडीचा विधी होत असताना नवरीच्या बहिणींनी त्यांच्या भावोजींशी म्हणजेच शिवशंकरशी गप्पा-गोष्टी आणि मस्करी करायला सुरुवात केली. या वेळी गमतीने त्यांनी नव्या भावोजींना विचारले की, ‘देशाचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?’ यावर शिवशंकर गोंधळला आणि त्याला साध्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. या एका गोष्टीमुळे रंजनाच्या (शिवशंकरची पत्नी) घरच्यांनी एक मोठा निर्णय घेतला. या वेळी रंजनाच्या घरच्यांनी शिवशंकर बुद्धीने कमी असल्याचे म्हणत त्याच्यातील कमतरता सांगू लागले. ते इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या मुलीचे लग्न पुन्हा नवरदेवाच्या छोट्या भावाशी लावून दिले.

यावर नवरदेवच्या वडिलांनी सांगितले की, नवरीकडच्या लोकांनी त्यांचा मुलगा शिवशंकर बुद्धीने कमी असल्याचे म्हणत त्यांची मुलगी रंजनाचे लग्न शिवशंकरच्या धाकट्या भावाशी लावून दिले. धाकटा भाऊ अजून लग्नाच्या वयाचाही नव्हता. तरीही मुलाकडच्या लोकांनी हे लग्न योग्य म्हणून मान्य करीत सुनेला पूर्ण सन्मानाने घरी आणले. पण एक दिवस अचानक रंजनाच्या माहेरच्या लोकांनी तिच्या सासरी येत तिला घेऊन जाण्याचा हट्ट केला. या संपूर्ण प्रकरणानंतर नवरदेवाच्या वडिलांनी पोलिसांना बोलावले. आता हे प्रकरण पोलिसांकडून हाताळले जात आहे.

Story img Loader