देशभरात गेले नऊ दिवस नवरात्रोत्सवाची धूम पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी गरबा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या गरबा कार्यक्रमांना लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत होता. पण, यावेळी गरबा खेळताना किंवा नाचताना अचानक मृत्यू झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत होत्या. आता उत्तर प्रदेशातूनही अशीच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यात गरबा खेळताना अचानक एक तरुण जमिनीवर कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ही घटना उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगरमधील एका नवरात्रोत्सव मंडळात घडली आहे. मुलायम राजभर (३४ वय) असे या मृत व्यक्तीचे नाव असून तो लोरपूर ताजन गावचा रहिवासी होता. गरबा खेळताना या तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. त्याला स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण आपल्या काही मित्रांसह गरबा खेळण्याचा आनंद घेत असतो. पण, खेळता-खेळता अचानक त्याला चक्कर येते आणि तो जमिनीवर कोसळतो. यावेळी त्याचे मित्र त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात, मात्र तो कोणतीही हालचाल करत नाही. यामुळे आजूबाजूला असलेले लोक नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी त्याच्या भोवती गर्दी करतात. यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांनी असा दावा केला की, त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.