सोशल मीडियावर रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी नको ते स्टंट करणाऱ्या लोकांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असे स्टंट अनेकदा सामान्य नागरिकांसाठी धोकादायक ठरतात. याबाबतची अनेक उदाहरणं आपण याआधीही पाहिली आहेत. अशातच आता एका जोडप्याचा व्हिडीओ समोर आहे, ज्यामध्ये ते भरधाव बाईकवर रोमान्स करताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून भररस्त्यात बाईकवर रोमान्स करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच उत्तर प्रदेशातील हापूर येथील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक जोडपे धावत्या बाईकवर रोमान्स करताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण बाईक चालवताना दिसत आहे, तर त्याच्यासमोर त्याची प्रेयसी बसली आहे. यावेळी प्रेयसीने त्या तरुणाला घट्ट मिठी मारल्याचं पाहायला मिळत आहे. तर हेल्मेट न घातल्याने या जोडप्याने रस्ता सुरक्षा नियमांचेही उल्लंघन केल्याचा आरोप अनेक नेटकऱ्यांनी केला आहे. तसेच जोडप्यावर कडक कारवाई करावी अशी मागणीही अनेकांनी वाहतूक पोलिसांकडे केली आहे.

Union Minister L Murugan visited the youth home
“त्यांनी माझ्या मुलाचं जानवं कापलं आणि म्हणाले पुन्हा…”, दिव्यांग मुलाच्या वडिलांची तक्रार; तमिळनाडू पोलिसांनी मात्र दावा फेटाळला
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
Instagram Love Affair Case
‘तो ‘इन्स्टा’वरच छान दिसत होता’, मुलीने मुलाला नाकारलं; चिडलेल्या मुलानं मग ‘तिचा’ तसला व्हिडीओ केला व्हायरल
Dhananjay Chandrachud
D Y Chandrachud : “…तर मी तुम्हाला हाकलून देईन”, सरन्यायाधीशांनी ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला सुनावलं
rape case news
Odisha Rape Case : आईचा मृत्यू, वडिलांना मानसिक आजार; पडक्या घरात राहणाऱ्या तरुणीवर महिनाभर बलात्कार, पोलीस म्हणतात…
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
Victim Aryan Mishra
Aryan Mishra Murder: आर्यन मिश्राला गोरक्षकांनी गोळ्या झाडून मारलं; वडील म्हणाले, “आम्ही पंडित आहोत…”
Suicide in uttarpradesh
Man Suicide in UP : “आयुष्यात हवं ते करा पण लग्न करू नका” म्हणत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या!

हेही पाहा- जबाबदारी माणसाला सगळं शिकवते! लोकलमध्ये वह्या पेन विकणाऱ्या शाळकरी चिमुकल्याचा VIDEO होतोय व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सिंभावली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग ९ वर घडली असून या जोडप्याच्या बेजबाबदार कृत्यावर अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच हापूर पोलिसांनी या जोडप्याला मोठा दंड ठोठावला आहे. दुचाकी चालकाला मोटार वाहन कायद्यानुसार आठ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी ट्विटद्वारे दिली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी असाट एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक जोडपे दिल्लीत बाईकवर रोमान्स करताना दिसले होते. वाहतूक पोलिसांनी या घटनेची दखल घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.