Accident Viral news: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. अशीच एक घटना सोशल मीडियावर समोर आला आहे, जी अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. ही घटना एक उदाहरण म्हणून देखील समोर आली आहे, जी ऐकून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. उत्तर प्रदेशमधील बरेलीमध्ये रस्ता अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. बरेली येथील एका अर्धवट बांधकाम झालेल्या पुलावरून रविवारी एक कार रामगंगा नदीत पडल्याने तिघांचा मृत्यू झाला, आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अपघाताचं कारण ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल.

खलपूर-दातागंज मार्गावर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला जेव्हा कारमधले लोक बरेली ते बदाऊन जिल्ह्यातील दातागंजला जात होते. कारमधील जीपीएस वापरून नेव्हिगेट करत असलेली कार पुलाच्या खराब झालेल्या भागातून कोसळली, असे पोलिसांनी सांगितले. “यावर्षीच्या सुरुवातीला, पुरामुळे पुलाचा पुढचा भाग नदीत कोसळला होता, परंतु हा बदल जीपीएसमध्ये अपडेट केला गेला नव्हता. परिणामी, चालकाची दिशाभूल झाली आणि पूल असुरक्षित असल्याचे लक्षात आले नाही. तंत्रज्ञनावार डोळे झाकून विश्वास ठेवणे किती महागात पडू शकते हे या व्हिडीओतून दिसत आहे.

कारमधील प्रवासी पुलावरून काही फूट खाली नदीत पडले. माहिती मिळताच फरीदपूर बरेली आणि जिल्हा बदाऊन पोलीस ठाण्याचे दातगंज पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून कार आणि त्यातील तिन्ही प्रवाशांना नदीतून बाहेर काढले. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: ट्रेनमध्ये वृद्धाला हार्ट अटॅक; टीटीईने वाचवले प्राण, तरीही होतेय मोठ्या प्रमाणात टीका, तुम्हीच सांगा नेमकं काय चुकलं?

बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना

सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावर इंडिकेटर आणि बॅरियर्स दोन्ही लावले नसल्याचे सांगण्यात येत आहे. जीपीएस नेव्हिगेशन देखील अद्यतनित केले गेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग बदाऊन यांना पुलाच्या दोन्ही बाजूंना रस्ते बांधायचे होते. सुमारे २वर्षांपासून हा पूल अपूर्ण होता. त्यामुळे वाहतूक होत नव्हती. जीपीएस अद्ययावत न झाल्याने व बॅरिअर्स आदी न लावल्याने मोठी दुर्घटना घडली.

“याला म्हणतात स्वत:हून मृत्यूच्या जाळ्यात अडकणे”

यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून यामध्ये सर्वात आधी चूक ही कार चालकाची असल्याचं म्हणत आहेत. एकानं प्रतिक्रिया दिलीय की, “एखाद्या तंत्रज्ञानावार एवढंही अवलंबून राहू नये” तर आणखी एकानं म्हंटलंय की, “याला म्हणतात स्वत:हून मृत्यूच्या जाळ्यात अडकणे”

v