रस्त्यावर भरधाव वेगाने किंवा विचित्र पद्धतीने स्टंट करत बाईक चालवणं धोकादायक ठरु शकतं. त्यामुळे बाईकस्वारांचा जीव तर धोक्यात येतोच, शिवाय त्यांच्या चुकीच्या बाईक चालविण्याच्या पद्धतीमुळे इतर वाहनांनाचा देखील अपघात होऊ शकतो. बाईक चालकांच्या चुकांमुळे झालेल्या अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये बाईकवर विचित्र स्टंट करणाऱ्या तरुणाला उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पोलिसांनी पकडले आहे. यावेळी पोलिसांनी मजेदार शब्दांत या तरुणाला समजावलं आहे. जे पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे.
पोलीस अधिकारी या व्हिडीओत म्हणतात की, आम्हाला तुमची खूप काळजी आहे, त्यामुळे आता तुम्हाला ही बाईक आम्ही चालवू देणार नाही, ती जप्त केले जाईल. या घटनेचा व्हिडीओ एएनआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. जो लखनऊच्या गौतमपल्ली पोलीस स्टेशन परिसरातील आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणाला इन्स्पेक्टर सुधीर कुमार यांनी पकडलं आहे. हा तरुण बाईकवर विचित्र स्टंट करुन त्याचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करायचा. पोलिसांनी त्याला पकडले तेव्हा तो रस्त्यावर स्टंट करत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याची बाईक ताब्यात घेतली.
हेही वाचा- वडील बदकाच्या पिल्लांना मदत करायला गेले ते परतलेच नाहीत, मुलांच्या डोळ्यासमोर घडली दुर्दैवी घटना
या व्हिडीओत पोलिस त्या बाईक चालकाला म्हणतात, “तुझ्या बाईकचा पुढे आणि मागे नंबर नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तु करत असलेल्या स्टंटचे व्हिडिओ फोनमध्ये सापडले आहेत. याचा अर्थ काय? तुझ्या आई-वडिलांना तुझी काळजी नाही, पण आम्हाला तुझी खूप काळजी आहे. तु सुरक्षित रहावे अशी आमची इच्छा आहे, त्यामुळे तुझी बाईक आम्ही जप्त करणार आहे.”
हेही वाचा- महिना १६ लाख पगार, अर्जदार असावा केवळ १२ वी पास; तरीही कोणी करेना जॉब कारण…
बाईक चालकाला समजावून सांगताना पोलिस पुढे म्हणतात की, तु स्टंट करताना एखाद्याला धडकलास तर काय हाईल? आता ही गाडी तुझ्याकडे राहणार नाही. बेटा, तू तुझ्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहेस ना? आम्हाला तुमच्याबद्दल खूप काळजी वाटते की तुम्हाला काहीही होऊ नये. तु गाडीचे चाक उचलून स्टंटबाजी करत आहेस, त्यामुळे तुझ्या आई-वडिलांनी रडावे अशी आमची इच्छा नाही, असं पोलीस त्या तरुणाला अनोख्या आणि मजेशीर पद्धतीने समजावत आहेत. जे नेटकऱ्यांना चांगलच भावलं आहे. त्यामुळे अनेक नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट करत असल्याचं पाहायला मिळत आहे.