आजकाल सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विनोदी अर्ज, लग्नपत्रिका तर कधी पत्र व्हायरल होत असतात. काही दिवसांपुर्वी एका कंपनीतील कर्मचाऱ्याने आवडती वेब सीरिज पाहण्यासाठी सुट्टीचा मेल आपल्या बॉसला केल्याची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. अशातच आता एका पोलिसाचा रजेचा अर्ज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नुकतच लग्न झालेल्या एका हवालदाराने आपल्या वरिष्ठांना रजेचा अर्ज लिहिला आहे. त्यामध्ये त्याने ‘माझी बायको रागवली असून, ती माझा उचलत नसल्यामुळे मला सुट्टी द्या; असं अर्जात लिहिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हवालदाराचे नुकतेच लग्न झालं आहे शिवाय सध्या हिवाळाचे दिवस सुरु आहे. त्यामुळे नवऱ्याने आपणाला बाहेर फिरायला घेऊन जावं, अशी या हवालदाराच्या बायकोची इच्छा आहे. पण तिचा नवरा लग्न झाल्यापासून रोज ड्युटीवर जात आहे. त्यामुळे नाराज झालेल्या पत्नीने आपल्या नवऱ्याचा फोन उचलनं बंद केलं आहे.
बायकोची समजूत काढून कंटाळलेल्या हवालदाराने शेवटी वरिष्ठांना एक रजेचा पाठवाल यामध्ये त्याने लिहिलं की, ‘रजा न मिळाल्याने माझी पत्नी संतापली असून वारंवार फोन कट करत आहे.’ आता हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या महाराजगंज जिल्ह्यात तैनात असलेल्या एका हवालदाराने १० जानेवारीपासून एका आठवड्याची सुट्टी मागितली होती.
हेही पाहा- बापरे! चक्क जीभेने दरवाजा उघडून गाय गोठ्यातून पळाली, Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
कॉन्स्टेबलने आपल्या पत्रात सांगितले आहे की, त्याचे महिन्याभरापूर्वीच लग्न झाले आहे. तेव्हापासून त्याची ड्युटी सुरू आहे. रजा न मिळाल्याने पत्नी रागवली आहे. शिवाय रागावल्यामुळे ती आपला फोनही उचलत नाही, फोन केला की ती कट करते आणि फोन उचलला तर सासूच्या हातात देते. या हवालदाराचे पत्र वाचून त्याच्या वरिष्ठांनादेखील हसू आवरण कठीण झालं होतं.
५ दिवसांची सुट्टी मिळाली –
हेही पाहा- Viral Video: सायकलस्वाराचा आत्मविश्वास पाहून नेटकरी झाले थक्क, म्हणाले “आयुष्यात एवढं बिनधास्त…”
शिवाय, “मी माझ्या पत्नीला वचन दिले आहे की, माझ्या पुतण्याच्या वाढदिवसाला नक्कीच घरी येईल, त्यामुळे कृपया मला १० जानेवारीपासून ७ दिवसांची रजा द्या. मी तुमचा ऋणी राहीण.” असही हवालदाराने आपल्या पत्रात लिहिले आहे. हवालदाराचे हे पत्र पाहून अप्पर पोलिस अधीक्षकांना आपल्या हवालदाराची परिस्थिती समजून घेत त्याला ५ दिवसांची रजा दिली आहे. शिवाय सुट्टी मिळताच हवालदार आपल्या पत्नीला भेटायला गेला आहे. पण या हवालदाराच्या पत्र लिहिण्याचा अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे.