उत्तर प्रदेशातील पोलीस सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. शिवाय सध्या ते अशा कारणासाठी चर्चेत आहेत, ज्याचा तुम्ही कधी विचारदेखील केला नसेल. कारण सध्या यूपी पोलिसांचा असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी चक्क हातकडी घातलेल्या आरोपीला बाईक चालवायला दिली असून स्वत: मात्र मागे बसले आहेत. ही घटना यूपीमधील शामली येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दोन पोलिसांनी एका आरोपीला हातकडी लावली आहे. यावेळी रस्त्याच्या कडेला असणारी बुलेट ते आरोपीला चालवायला देतात. त्यानंतर आरोपी बाईक चालू करतो आणि मग दोन्ही पोलीस त्याच्या मागे बसतात आणि ते तिघे तेथून भरधाव वेगाने निघून जातात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी पोलिसांच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवाय हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहेत.
हेही पाहा- खेळणं समजून चिमुकल्याने अजगराला मारली मिठी, अंगावर बसण्याचा प्रयत्न केला अन्…, थरारक Video व्हायरल
पोलिसांनी आरोपीला बाईक चालवायला का दिली ?
माहितीनुसार, पोलीस आरोपीला न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात होते. शामली येथून कैराना न्यायालयात जात असताना आरोपी आणि पोलीस थकले. यावेळी कैराना रोडवर आरोपीने, “मला आराम करायचा आहे” असं सांगितलं, यावेळी पोलिसांनी त्याला झाडाखाली नेले. दरम्यान, या तिघांमध्ये काही संभाषण झालं आणि पोलिसांनी आरोपीला बाईक चालवायला दिली.
निष्काळजीपणामुळे पोलीस निलंबित –
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलिसाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. हातकडी घातलेल्या आरोपीला पोलिसांनी बाईक चालवायला दिल्याचं पाहताच लोकांनी या घटनेचा व्हिडिओ शूट केला, जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर घटनेतील पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर पोलिसांना त्यांचा निष्काळजीपणा चांगलाच महागात पडला असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.