Jawan Film : बॉलिवूडच्या’किंग खान’ अर्थात शाहरुख खानच्या ‘जवान’ची बॉक्स ऑफिसवर हवा कायम आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने दमदार ओपनिंग करत बॉलिवूडमध्ये पहिल्याच दिवशी सर्वात जास्त ओपनिंग करणारा चित्रपट ठरला. दुसऱ्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर जवान सुपरफास्ट असल्याचे पाहायला मिळाले. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’ या नव्या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. जवान बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करत आहे. या चित्रपटात शाहरुख खानने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली असूनव या चित्रपटाच्या लोकप्रियतेकडे उत्तर प्रदेश पोलिसांचेही लक्ष लागले आहे. वाहतूक नियमांचे पालन करण्याचा संदेश देण्यासाठी त्यांनी सोशल मीडिया साइटवर एक पोस्टर शेअर केली आहे. या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.
पोस्टरमध्ये एका बाजूला शाहरुख खान तर दुसऱ्या बाजूला हेल्मेट आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी हेल्मेट न वापरणाऱ्यांना त्याचा परिणाम काय होतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, तर शाहरुख खानचाही अपघात हेल्मेट न घातल्यामुळेच झाला हे ते सुचीत करत आहेत.
यूपी पोलिसांनी हटके पद्धतीने दिला मेसेज
या पोस्टरमध्ये तुम्ही पाहू शकता, शाहरुख खान जखमी अवस्थेत दिसत आहे. वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर काय होऊ शकते हे समजून घेण्यासाठी हे पोस्टर पुरेसे आहे. जर तुम्ही रस्ता अपघाताला बळी पडलात तर तुम्हाला दुखापत होऊ शकते. एक छोटासा निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकते. शाहरुख खानच्या फोटोवर हे टाळा असे लिहिले आहे. दुसरीकडे, हेल्मेटचा अवलंब करण्याची सूचना करण्यात आली आहे. वाहन चालवताना हेल्मेट घालण्याचे महत्त्व सांगितले आहे. यावेळी यूपी पोलिसांची जनजागृती करण्याची शैली पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. यूपी पोलिसांनी काव्यमय पद्धतीने लिहिले की, तरुण असो वा वृद्ध, दुचाकीवर बसण्यापूर्वी हेल्मेट कधीही विसरू नका.
पाहा पोस्ट
पोलिसांनी दिलेला ट्रॅफिक संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चित्रपटाच्या माध्यमातून पोलिसांच्या जनजागृती करण्याच्या प्रयत्नाचे कौतुक होत आहे. जवान या चित्रपटात शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा, प्रियामणी, सुनील ग्रोवर, एजाज खान, संजीता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, गिरीजा ओक यांच्या भूमिका आहेत. यात दीपिका पदुकोण आणि संजय दत्त स्पेशल अपिअरन्समध्ये दिसले आहेत.
‘जवान’ची रेकॉर्डब्रेक कमाई
हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी सिल्व्हर स्क्रीनवर आला. रिलीजनंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाने तीन दिवसांत ‘दुहेरी शतक’ ठोकले आहे. २०० कोटी क्लबमध्ये सामील चित्रपट झाला आहे. रिलीज होताच ‘जवान’ने पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा किताब पटकावला. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत २०० कोटींची कमाई केली आहे.