उत्तर प्रदेश मधल्या रायबरेलीमध्ये चीड आणणारा एक प्रकार समोर आला आहे. एका तरूणाला तब्बल सहा गुंडांनी मिळून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. २ मिनीट आणि ३० सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये एक मुलगा जमिनीवर बसलेला दिसत असून त्याने कान पकडलेले आहेत. काही गुंड हे एका बाईकवर बसलेला असून त्याला आपले पाय चाटायला लावताना स्पष्टपणे दिसत आहे. हे प्रकरण इथवरंच नाही थांबलं तर त्या विद्यार्थ्याला चक्क बेल्ट आणि पॉवर केबलने बेदम मारहाण केलीय. याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ १० एप्रिल रोजीचा असल्याचं सांगण्यात येतंय. या व्हिडीओमधला विद्यार्थी हा १० वीत शिकत असून तो जगतपूर शहरात राहणारा आहे. त्याची आई कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कठोर परिश्रम करते. तिच्या पतीचे १० वर्षांपूर्वी निधन झाले होते. ती तिच्या मुलासोबत इथे राहते. त्याच्या आईने या गुडांच्या शेतात काम केल्याचं सांगितलं जात आहे. आईच्या मजुरीच्या पैशांची मागणी करण्यासाठी हा विद्यार्थी या गुंडांकडे गेला होता. याचा राग मनात धरून पाच ते सहा गुंडांनी त्याला बेदम मारहाण केली. इतकंच नव्हे तर “आम्हाला ओळखत नाहीस का? असं म्हणत त्याला शिवीगाळ करण्यासोबतच जातीवाचक शब्दही बोलले.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Shocking Video Udupi Man Tossed In Air
हवा भरताना अचानक फुटला स्कुल बसचा टायर अन् पुढे….;अंगावर शहारा आणणारा Video Viral
Shocking video delhi two girls fight in college video viral on social media
“अगं सोड जीव जाईल तिचा”, भर कॉलेजमध्ये तरुणींमध्ये कपडे फाटेपर्यंत हाणामारी; VIDEO पाहून धक्का बसेल
Shocking video guy on Bike was Harrasing the School girls Got Good treatment from Police
VIDEO: आता तर हद्दच पार केली! बाईकवर आला अन् महिलेला अश्लिल स्पर्श करुन गेला; मात्र पुढे काय घडलं ते पाहाच

ही घटना गेल्या शुक्रवारची आहे, मात्र रविवारी हा व्हिडीओ समोर येताच पोलिसांनी कारवाई करत सहा आरोपींना अटक केली. त्यापैकी दोघे अल्पवयीन आहेत. या गुंडांनी त्याला फिरण्याच्या बहाण्याने बागेत नेलं आणि मारहाण केली. त्याला गुंडांनी आपले पाय देखील चाटायला लावले. यानंतर तरुणाला रक्ताच्या थारोळ्यात टाकून सर्वजण पळून गेले. काही वेळाने स्थानिक लोक तिथून गेले, त्यानंतर त्यांनी ही बाब तरुणाच्या आईला सांगितली. तरूणाच्या आईने सहा आरोपींविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.

आणखी वाचा : VIRAL VIDEO: हातात मोबाईल घेऊन ऐटीत बसले माकड, जणू काही सिक्रेट मिशन आखत आहे!

पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. मंडळ अधिकारी दलमाऊ अशोक सिंह यांनी सांगितले की, आरोपी हृतिक सिंग, शिवम मौर्य, विकास हरिजन, अभिषेक, महेंद्र प्रजापती, उत्तम सिंग यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींपैकी दोन अल्पवयीन आहेत. त्यांना बालसुधारगृहात पाठवले जात आहे. अन्य चार आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Story img Loader