सध्या सोशल मिडीयावर यूपी रोडवेज बसच्या ड्रायव्हरने केलेला जुगाड चर्चेचा विषय बनत आहे. पावसाळ्यामध्ये चारचाकी वाहनांना वायपरची गरज असते. मात्र, या बस चालकाच्या बसचा वायपर खराब झाल्याने याने असा काही जुगाड केलाय की तो पाहून लोक थक्क झाले. या भावाने अतिशय साध्या पद्धतीने खराब वायपर चालवण्याची सोपी युक्ती केली.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपल्याला उत्तर प्रदेशचे खड्डेमय रस्ते देखील दिसत आहेत. खरं तर बसचा वायपर खराब झालेला आहे. त्यामुळे बसचालकाने पावसाळ्यात या वायपरचा वापर करण्यासाठी दोरी आणि प्लास्टिकच्या बॉटलने देसी जुगाड केला आहे. या बसच्या वर UP Roadways आणि खाली Meerut असे लिहिलेले आहे. आपण बघू शकतो की, विंडशील्डला लावलेल्या वायपर सोबत असलेल्या दोरीच्या साहाय्याने लटकत असलेली बॉटल देखील दिसत आहे. जेव्हा जेव्हा बसच्या ड्रायव्हर दोरीवरून वायपर ओढताच ती बाटलीच्या वजनाने आहे त्या जागेवर पुन्हा येते. या जुगाडामुळे वायपरमध्ये बिघाड होऊनही चालकाला पावसाळ्यात बसची काच व्यवस्थित साफ करता येते.
( हे ही वाचा: Viral Video: पैसे घेऊन पिझ्झा घ्यायला आलेल्या चिंपाझीला पाहून डिलिव्हरी बॉय पडला बुचकळ्यात! पुढे असं काही घडलं की…)
असा जुगाड कधी पाहिला आहे का?
( हे ही वाचा: आलिया-रणबीरच्या ‘Kesariya’ चा भोजपुरी व्हर्जन व्हायरल; लोकांना ओरिजनल गाण्यापेक्षा जास्त आवडतोय हा Video!)
म्हणूनच जुगाड करण्यात भारतीयांना नंबर १ म्हटले जाते
हा व्हिडिओ @Gulzar_sahab या ट्विटर हँडलवरून हा शेअर करण्यात आला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले – मेरठमधील रोडवेज बसच्या खराब स्थितीवर ड्रायव्हरच्या जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आतापर्यंत या क्लिपला १० हजाराहून अधिक व्ह्यूज आणि दोनशेहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच ही क्लिप सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाली आहे.