सासू-सूनेचं नात म्हणजे बहुदा ३६चा आकडा. सासू-सुनांच्या भांडणाचे किस्से आपण नेहमी ऐकले असतील. पण सध्या सासू-सूनेचं नातं एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. एका महिला नवऱ्याच्या नव्हे तर सासूच्या प्रेमात पडली आहे.”सुनेने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असून आणि मी तसे करण्यास नकार दिल्यास परिणाम भोगण्याची धमकी दिली आहे” असा धक्कादायक आरोप यूपीमधील बुलंदशहर येथील एका महिलेने केला आहे. ” याप्रकरणी महिलेने पोलिसांकडे धाव घेत मदत मागितली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये एका महिलाने तिची व्यथा मांडली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये सासूने सांगितले की, माझ्या सुनेचे वागणे पहिल्या दिवसापासूनच योग्य नव्हते आणि तिचे विचित्र वागणे कालांतराने वाढत गेले. जेव्हा माझ्या सुनेने माझ्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली तेव्हा तिने सर्व मर्यादा ओलांडल्या.” सासू-सासरे एकांतात वेळ घालवतात हे सुनेला आवडत नसे आणि जेव्हाही ती दोघांना एकत्र पाहात असे तेव्हा चिडचीड करत, असेही महिलेने व्हिडीओमध्ये सांगितले आहे.

Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
hemal ingle bridal to be party
Video : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मैत्रिणींसह केली Bride To Be पार्टी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
Sanju Samson's wife reacts to hundred vs Proteas: My forever favourite hero
Sanju Samson : ‘तेरा ध्यान किधर है, तेरा हीरो…’, संजू सॅमसनच्या शतकी खेळीनंतर पत्नी चारुलताच्या इन्स्टा स्टोरीने वेधलं लक्ष

हेही वाचा – उन्हापासून वाचण्याचा हटके जुगाड, ट्रॅफिक सिग्नलवर….; Viral Video पाहून पुणेकर म्हणे,”आम्हालाही ही सुविधा द्या”

सासूने धक्कादायक दावा केला की,”एके दिवशी मला सुनेने सांगितले तिला माझ्यासह लग्न करायचे आहे. तिला तिच्या नवऱ्याबरोबर राहायचे नाही. सुनेने दोघींच्या नवऱ्याला सोडून मला पळून जाऊन आणि दूर कुठेतरी राहण्याची कल्पना देखील सुचवली.”

सासू म्हणाली की, “जेव्हा तिने आपल्या सुनेला समजावण्याचा प्रयत्न केला की, “ती जे सुचवत आहे ते योग्य नाही, तेव्हा सून तिला समलिंगी विवाहाची प्रकरणे दाखवत असे आणि असा युक्तिवाद कर असे की, जर समलिंगी विवाह इतरत्र होऊ शकतो, तिला माझ्याशी(सासू) लग्न करायचे असेल तर काय चुकले.”

अखेर सासूबाईंना हे सर्व सहन झाले नाही आणि तिने याबाबत काहीतरी करण्याचे ठरवले. सासूने असहायता व्यक्त करताना सांगितले की, “जेव्हा मी सुनेच्या पालकांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी या प्रकरणातून हात काढून घेतला.”

सासूने दिलेल्या माहितीनुसार,”सुनेचे आई-वडिल म्हणाले की, त्यांच्या मुलीबरोबर जे करायचे आहे ते करा आणि आता ती सासरची जबाबदारी आहे.” मुलीच्या पालकांनी हुंडा म्हणून २०लाख रुपये मागितल्याचा दावाही सासूने केला आहे.

हेही वाचा – शाळेत यायला उशीर झाला म्हणून शिक्षिका अन् प्राचार्यामध्ये वाद, मारामारीचा Video Viral

“आपल्या मुलाची फसवणूक झाली आणि त्याच्याबरोबर जे काही झाले ते योग्य नाही”, असे महिलेने सांगितले. याप्रकरणी तिने पोलिसांकडेही मदत मागितली आहे. MANOJ SHARMA LUCKNOW UP या एक्स खात्यावर हा व्हिडीओ शेअर केलेला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर वापरकर्त्यांनी शेअर केला आहे. नेटकऱ्यांना महिलेचे आरोप ऐकून धक्का बसला आहे.