Viral video: सर्वसामान्यांच्या अगदी जवळचा विषय म्हणजे लोकल. रेल्वे तिकिटाची किंमतही अगदी क्षुल्लक आणि परवडणारी असते. तरीही काही फुकटे प्रवासी तिकीट काढत नाहीत. काही दिवसांपासून रेल्वेने या फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यास सुरुवात केलीय. याचाच गैरफायदा घेत गेल्या काही वर्षांत रेल्वेस्थानकांत, लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये तोतया तिकीट तपासनीसांचा सुळसुळाट झाला आहे. एका तरुणीने चक्क टीटीई अर्थात प्रवासी तिकीट परीक्षक बनून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. या बनावट टीटीईचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. प्रवाशांनी या तरुणीचा भांडाफोड केला असून, त्याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशातील झांशी येथे पातालकोट एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली. संबंधित तरुणीचे हावभाव पाहून प्रवाशांना ती बनावट टीटीई आहे, अशी शंका आली. मग त्यांनी तिची विचारपूस करताच तिचा खरा चेहरा समोर आला. प्रवाशांनी तिला पोस्टिंग आणि इतर बाबींबद्दल विचारले असता, ती बनावट टीटीई गडबडली. मग प्रवाशांचा संशय वाढला आणि सत्य समोर आले. प्रवाशांनी तिला जॉब नंबर आणि इतर काही पुरावे दाखविण्यास सांगितले. आयडी कार्डबद्दल प्रवाशांनी विचारले असता, तरुणीची तारांबळ उडाली.

शेवटपर्यंत ‘रुबाब’ नाही हटला

दरम्यान, काही प्रवाशांनी बनावट टीटीईला कोंडीत पकडल्यानंतर तिच्या सर्व लक्षात आले. मग तिने सावध पवित्रा घेत जॉब नंबरबद्दल बोलणे टाळले. त्यानंतर तिने तिकीट नका दाखवू, असे म्हणत तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, हुशार प्रवाशांनी तिचीच फिरकी घेत आमच्याकडे तिकीटच नसल्याचे तिला निक्षून सांगितले. मग तिने पुढे आणखी आपले नाटक पुढे सुरू ठेवत सांगितले की, मॅडमच्या सांगण्यावरून मी इथे आली आहे. माझे इथे काही चालत नाही. मी मध्य प्रदेशात असते. त्या तोतया टीटीई तरुणी आपले सोंग उतरवायला तयार नव्हती. शेवटचा प्रयत्न म्हणून तिने संबंधित प्रवाशाला आपल्यासोबत चल, असे सांगून स्वत:ला खरे ठरवण्याचा प्रयत्न केला; पण तिथेही तिला अपयश आल्याने अखेर तिचा भांडाफोड झाला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> डोळ्यात ना लाज ना पश्चाताप; पाकिस्तानात महिलेनं दोघांना चिरडल्यानंतरही चेहऱ्यावर हास्य, VIDEO चा शेवट आणखी संतापजनक

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर युजर्स संतापजनक प्रतिक्रिया देत महिलेवर टीका करीत आहेत. एका युजरने कमेंटने केलीय, “आजकाल सर्वत्र फसवणूक करणारे लोक फिरत आहेत, कोण बरोबर आणि कोण चूक हे शोधणे कठीण झाले आहे.” तर आणखी एकाने म्हटलेय, “प्रवास करताना सावधगिरी बाळगा आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची तक्रार करा. तिला शिक्षा होईल, अशी आशा आहे.”