उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुणांनी बुरखा घातलेल्या मुस्लीम मुलींशी गैरवर्तन केल्याचे दिसत आहे. संतापजनक बाब म्हणजे, या व्हिडीओतील मुस्लीम मुलींनी एका हिंदू तरुणाशी मैत्री केली, म्हणून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडीओमध्ये काही तरुण या मुलींना बुरखा काढण्यास सांगत असल्याचे ऐकू येत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी मुलींशी गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर मेरठ पोलिसांनी, या घटनेची गंभीर दखल घेतली असल्याचे सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या देशभरात ‘द केरला स्टोरी’ चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. चित्रपटाचा आशय आणि त्यातील दावे यावरून वाद निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे. न्यायालयाने समज दिल्यानंतर काही दावे चित्रपटाच्या प्रोमोममधून काढण्यातही आले होते. या चित्रपटामुळे देशात धर्माधर्मांत तेढ निर्माण झाल्याची टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मेरठमध्ये नुकतीच घडलेली एक घटना चर्चेत आली आहे.

हेही वाचा- लग्नाची अट मान्य करत सुशिक्षित तरुणाने केलं दोन सख्ख्या बहिणींशी लग्न, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडीओतील दोन मुस्लीम मुली मेरठच्या भगतसिंग मार्केटमध्ये एका हिंदू मित्रासोबत शॉपिंग करत होत्या. या वेळी काही लोक तिथे आले आणि त्यांनी मुलींना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. शिवाय या जमावाने मुलींना त्यांचा चेहरा दाखवण्यास सांगितल्याचेही व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. शिवाय, “तुम्ही हिंदूंना मित्र बनवणार का?” असा प्रश्न जमावातील काही लोकांनी मुलींना विचारल्याचे व्हिडीओत दिसत आहे

तरुणाला धक्काबुक्की आणि शिवीगाळ –

पाहा व्हिडीओ –

हेही पाहा- Viral video : ये इश्क नही, रिस्क है भैया! कारमध्ये बसल्याचा फील घेत स्कूटीवर करत होते रोमान्स

व्हिडीओत काही लोकांनी जबरदस्तीने या मुलींचा बुरखा काढत त्यांना चेहरा दाखवण्यास सांगितल्याचे दिसत आहे. तर मुलींच्या हिंदू मित्रालादेखील जमावाने प्रश्न विचारायला सुरुवात केली. या वेळी तो तरुण, “कृपया माझे ऐका, आम्ही स्टाफ आहोत,” असे सांगतो. मात्र, लोकांनी त्या तरुणाला धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोक संताप व्यक्त करत आहेत.

एका यूजरने लिहिले की, ‘समाजात हिंदू-मुस्लीम फूट पडली आहे, आजकाल लोकांना यापेक्षा मोठा दुसरा कोणताच मुद्दा दिसत नाही. अशाने हिंदू आणि मुस्लीम कोणीही शांततेने जगू शकणार नाही!’ @parvezhmadj नावाच्या यूजरने, ‘जे मुलींना चेहरा दाखवायला सांगत आहेत, त्यांना तुरुंगात पाठवा,’ असे म्हटले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर मेरठ पोलिसांनी म्हटले आहे की, या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुराव्याच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up two muslim girls abused by mob for being friends with hindu boy video goes viral on social media jap
Show comments