प्रयागराजमधील उमेश पाल हत्याकांड प्रकरणातील फरार असलेला गँगस्टर अतीकचा मुलगा असद आणि शूटर गुलाम मोहम्मदला उत्तर प्रदेश पोलिसांनी ठार केलं आहे. झाशीतल्या बडागाव येथील परीछा डॅमजवळ एसटीएफने असद आणि गुलामचा एन्काउंटर केला. दोघांवरही प्रत्येकी पाच-पाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. यूपी पोलिसांच्या या कारवाईनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते विधानसभेत गुन्हेगारांच्या मुद्यावर बोलताना ‘माफियां को मिट्टी में मिला देंगे…’ असं म्हणताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असद आणि गुलाम मोहम्मद या दोघांनी २४ फेब्रुवारी रोजी उमेश पाल यांची हत्या केली आणि दोघेही फरार झाले. एसटीएफचं विशेष पथक सातत्याने या दोन आरोपींचा शोध घेत होतं. ते दोघे झाशी येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ठार केलं. एसटीएफचे उपमहानिरीक्षक (DIG) अनंत देव तिवारी म्हणाले, ‘आमच्या पथकाने या दोघांना ठार केल्यानंतर त्यांच्याकडून पिस्तूल, रिव्हॉल्व्हर आणि परदेशी शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत.’

हेही वाचा- पोलिसाने कॉलगर्ल डीलरशी केलेलं चॅट सोशल मीडियावर व्हायरल, बातमी देणाऱ्या पत्रकारावर गुन्हा दाखल

गुन्हेगारांवरील कारवाईनंतर सीएम योगींचा काही दिवसांपुर्वीचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये, मुख्यमंत्री योगी उत्तर प्रदेश विधानसभेत म्हणत आहेत की, माफिया कोणीही असो, सरकार त्याला उद्ध्वस्त करण्याचे काम करेल. व्हिडीओत सीएम योगी म्हणतात, “हे गुन्हेगार आणि माफिया, हे कोणी वाढवले ​​आहेत? ज्यांच्या विरोधात एफआयआर दाखल आहे त्याला समाजवादी पार्टीने खासदार केले हे खरे नाही का? तुम्ही गुन्हेगारांना आश्रय देता आणि पुन्हा तमाशा करता. या माफियांना आम्ही जमीनदोस्त करू.”

हेही पाहा- चिमुकला पायऱ्यांवरून पडणार तितक्यात आईने उडी मारली अन्…, थरारक Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

यूपी सीएमओच्या म्हणण्यानुसार, एन्काउंटरनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बैठक घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी यूपी एसटीएफ तसेच डीजीपी, विशेष डीजी कायदा आणि सुव्यवस्था आणि संपूर्ण टीमचे कौतुक केले. प्रधान सचिव गृह संजय प्रसाद यांनी मुख्यमंत्र्यांना या चकमकीची माहिती दिली. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आला आहे.

सोशल मीडियावर ‘योगी है तो यकीन है..’ चे नारे –

गँगस्टर अतीकचा मुलगा असद आणि शूटर गुलाम मोहम्मदचा एन्काउंटर केल्यानंतर सोशल मीडियावर यूपी पोलिसांच्या बाजून आणि विरोधात पोस्ट व्हायरल होत आहेत. यातील बहुतांश पोस्ट या योगींचे कौतुक करणाऱ्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, मीडिया अतिकची कार पाहत राहिला आणि बाबाच्या पोलिसांनी गेम करुन टाकला. तर आणखी एका नेटकऱ्याने, आता विचारा यूपी में का बा?. तर अनेकांनी योगी आहेत तर शक्य आहे, अशा पोस्ट ट्विटरवर शेअर केल्या आहेत.

उमेश पाल यांच्या पत्नीने मानले योगींचे आभार –

अतिक अहमदचा मुलगा असद अहमदच्या एन्काउंटरनंतर उमेश पाल यांची पत्नी जया पाल म्हणाल्या, “मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानते, त्यांनी जे केले ते खूप चांगलं केलं आहे. त्यांनी माझ्या पतीच्या मारेकऱ्यांना शिक्षा दिली. न्याय मिळाला, पोलिसांनी खूप सहकार्य केले.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up viral news video of cm yogi went viral on social media after the encounter of gangster atiq ahmeds son jap
Show comments