उत्तर प्रदेशमध्ये घडलेला धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक महिलने बँकेतील लॉकरमध्ये ठेवलेले दागिणी आणि १८ लाख रुपयांना वाळवी लागली आहे. लेकीच्या लग्नासाठी हे दागिणे आणि पैसे महिनेन हे पैसे बँकेत ठेवले होते. मुरादाबाद जनपद येथील बँक ऑफ बडोदाच्या आशियाना शाखेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. लॉकर कराराचे नुतनीकरण करण्यासाठी बोलावले जाईल तेव्हा महिलेला सर्व प्रकार समजला.
मिळालेल्या माहितीनुसार, आशियाना कॉलनीतील निवासी अलका पाठक यांनी ऑक्टोबर २०२२ रोजी बँक लॉकरमध्ये दागिने आणि १८ लाख रुपये मुलींच्या लग्नासाठी ठेवले होते. सोमवारी बँकेकडून लॉकच्या नुतनीकरणासाठी KYC अपडेटसाठी त्यांना बँकेत बोलवण्यात आले. जेव्हा त्यांनी लॉकर उघडले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. प्लॉस्टिक बॅगेत ठेवलेले १८ लाख रुपयांना वाळवी लागली होती. महिलेने बँक मॅनेजरला तक्रार केली आणि गोंधळ घातला. प्रकरण जसे समोर आले तसे वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र चर्चा सुरू झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा